माजी आमदार वैभव नाईक यांनी धक्कादायक खुलासा केला आहे. मालवण येथील सभेमध्ये त्यांनी हा खुलासा केला. यावेळी बोलताना त्यांनी दसऱ्याच्या दिवशी सुद्धा भरतशेठ गोगावले यांचा मला फोन होता, तुम्ही अजूनही आमच्यातून रहा , समोरच्या उमेदवाराचा अजूनही आम्ही प्रवेश घेतलेला नाही. तुम्ही जर आलात तर आम्ही त्यांचा प्रवेश घेणार नाही असा धक्कादायक खुलासा माजी आमदार वैभव नाईक यांनी मालवण येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधताना केला आहे.