पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणात आता नवनवीन खुलासे होत आहेत. वैष्णवीच्या मृत्युप्रकरणी अटकेत असलेल्या तिच्या सासू-सासरे, नवरा, नणंद यांच्या पोलीस कोठडीत काल, बुधवारी वाढ करण्यात आली. दरम्यान, हगवणे कुटुंबाचे वकील विपुल दुषिंग यांनी कोर्टात वैष्णवीसंबंधीत काही वक्तव्य केली. या वक्तव्यांनुसार वैष्णवीच्या चारित्र्याचे हनन करण्याचा प्रयत्न वकिलांनी केला. वकिलांच्या त्या वक्तव्यानं दुखावलेले वैष्णवीचे वडील आणि काका यांनी पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली. 'माझी मुलगी तर केली, मात्र तिच्या चारित्र्यावर संशय घेणं योग्य नाही', असे वैष्णवीचे वडील म्हणाले. यावेळी त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला आणि त्यांनी हात जोडून ही विनंती केली. या परिषदेत त्यांनी हुंड्यासाठी दिलेल्या गाड्यांचे कागदपत्र दाखवले. अनेक पुरावे त्यांनी सादर केले.