Cow hug Day
Cow hug Day Team Lokshahi
ताज्या बातम्या

‘व्हॅलेंटाईन डे’ गाईला मिठी मारण्याचा निर्णय केंद्र सरकारकडून मागे; मागे घेण्याचे 'हे' ठरले कारण

Published by : Sagar Pradhan

सध्या हा ‘व्हॅलेंटाईन डे’ वीक सुरु आहे. प्रेमवीरांनामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच प्रेमवीरांनासाठी केंद्र सरकारने एक कमालचा सल्ला दिला होता. केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय मंत्रालयाने १४ फेब्रुवारी हा दिवस ‘काऊ हग डे’ अर्थात ‘गाईला आलिंगन दिन’ म्हणजेच गाईला मिठी मारून साजरा करण्याचे निर्देश दिले आहे. 'व्हेलेंटाईन डे'च्या दिवशी गाईला मिठी मारून साजरा करावा असा आदेश सरकारने आज मागे घेतला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयावर देशभरातून टीका करण्यात आली. याच कारणामुळे केंद्र सरकारने याबाबतचा निर्णय मागे घेतला आहे.

काय होता निर्णय?

केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्य व्यवसाय मंत्रालयाचे सचिव डॉ.एस.के.दत्ता यांनी हे पत्रक काढून निर्देश दिले आहेत. या पत्रात ते म्हणाले की, गाय ही भारतीय संस्कृती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा बाजू आहे. गाय ही पशुधन आणि जैवविविधतेचे प्रतिनिधित्व करते. सोबतच मानवी जीवन टिकवते, सर्व ऐश्वर्य प्रदान करणारी, आईसारख्या प्रेमळ स्वभावामुळे गायीला ‘कामधेनू’ आणि ‘गौमाता’ म्हणून ओळखले जाते. काळानुसार पाश्चात्य संस्कृतीच्या प्रगतीमुळे वैदिक परंपरा जवळजवळ नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. पाश्चिमात्य संस्कृतीच्या झगमगाटाने आपली भौतिक संस्कृती आणि वारसा जवळजवळ विसरला आहे. गाईचा प्रचंड फायदा पाहता, गाईला मिठी मारल्याने भावनिक समृद्धी येते. त्यामुळे आपला वैयक्तिक आणि सामूहिक आनंद वाढतो. त्यामुळे सर्व गाईप्रेमींनी १४ फेब्रुवारी हा दिवस गाईचे महत्त्व लक्षात घेऊन गाईला आलिंगन दिन म्हणून साजरा करावा आणि जीवन आनंदी आणि सकारात्मक ऊर्जेने परिपूर्ण करावे. असे ते म्हणाले या पत्रात म्हणाले आहे. परंतु, आता या पत्राची प्रचंड चर्चा होत आहे.

हा निर्णय हास्यास्पद असल्याचे अनेकांनी म्हटले

अॅनिमल वेल्फेअर बोर्ड ऑफ इंडियाच्यावतीने 14 फेब्रुवारी रोजी व्हेलेंटाइन डे ऐवजी Cow Hug Day साजरा करण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर लोकांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली. हा निर्णय हास्यास्पद असल्याचे अनेकांनी म्हटले. सोबतच सोशल मीडियावर मीम्सची लाट आली होती. सोशल मीडियासह राजकीय नेत्यांनी देखील या निर्णयावर नाराजी व्यक्त केली होती. नाराजीसोबतच या निर्णयाची थट्टा देखील केली होती.

Ashish Shelar : एवढी घबराट आणि पळपुटेपणा उद्धवजी तुमच्या पक्षाचा असेल तर रिंगणातून बाहेरच जा

Sanjay Raut : निवडणूक यंत्रणा, निवडणूक आयोग हा पूर्णपणे सत्ताधारी पक्षाच्या पकडीत आहे

मतदानाच्या हक्क बजावल्यानंतर उज्ज्वल निकम यांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले...

Cm Eknath Shinde : बोगस मतदान आणण्याची आम्हाला आवश्यकता काय आहे? आज संपूर्ण मतदार जो आहे महायुतीच्या प्रेमात आहे

आमदार गणेश नाईक यांनी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर दिली प्रतिक्रिया, म्हणाले...