ताज्या बातम्या

लवकरच वंदे भारत एक्सप्रेस कोकण रेल्वे मार्गावर धावणार; चाचणी यशस्वी

Published by : Siddhi Naringrekar

निसार शेख, रत्नागिरी

कोकण रेल्वे मार्गावरुन वंदे भारत एक्स्प्रेस धावली आहे. मुंबईपासून गोव्याच्या दिशेने करण्यात आलेली प्राथमिक चाचणी आज मंगळवारी यशस्वी ठरली आहे. आता गोव्याहून ही एक्स्प्रेस पुन्हा मुंबईच्या दिशेने धावणार आहे. त्यामुळे कोकणात वंदे भारत एक्स्प्रेसने जाता येणार आहे.

आता राज्यात मुंबई-शिंर्डी आणि मुंबई-सोलापूर मार्गावर वंदे भारत धावत आहे. आता कोकण रेल्वे मार्गावर ही नवी कोरी गाडी धावणार आहे. त्यामुळे प्रवास एकदम आरामदायी होणार आहे. मुंबईहून गोव्याला जाण्यासाठी हायस्पीडमध्ये रेल्वेचा पर्याय उपलब्ध होणार आहे. कोकण रेल्वे मार्गावर सेमी हायस्पीड वंदे भारत एक्स्प्रेसची चाचणी घेतली गेली आहे. मुंबई ते मडगाव मार्गावर आज मंगळवारी यशस्वी चाचणी घेतली गेली आहे. या वंदे भारत रेल्वेचा वेग चांगला असल्याने कमी वेळात गोव्यात पोहोचता येणार आहे.

या गाडीचा कमाल 180 किमी प्रति तास वेग आहे. या अत्याधुनिक रेल्वेमध्ये जीपीएस बेस्ड पॅसएंजर इन्फॉर्मेशन सीस्टम, बायो व्हॅक्युम टॉयलेट्स, अ‍ॅटोमेटिक दरवाजे, वायाफाय आणि रिजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टिम आहे. देशातील पहिली तेजस एक्स्प्रेस कोकण रेल्वे मार्गावर धावली होती. ही एक्स्प्रेस सुरु आहे. तसेच डबल डेकर रेल्वेही या मार्गावर सुरु करण्यात आली होती. आता मुंबई ते गोवा वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहे. त्यामुळे आरामदायी प्रवास करता येणार आहे. देशभरातील विविध मार्गांवर ‘मेक इन इंडिया’अंतर्गत भारतात विकसित केलेली वंदे भारत एक्स्प्रेस धावू लागली आहे.

16 डब्यांची वंदे भारत एक्स्प्रेस मंगळवारी पहाटे 5.35 वाजता सीएसएमटी स्थानकातून सुटली. ती गोव्यात मडगावला दुपारी 2.30 वाजता पोहोचणे अपेक्षित आहे.वंदे भारत एक्स्प्रेस ही भारतीय बनावटीची असून देशातील सध्याची अत्यंत प्रतिष्ठेची रेल्वे असल्यामुळे तिच्या चाचणीदरम्यान रेल्वेच्या मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, ऑपरेटिंग, एस अँण्ड टी सुपरवायझर या सर्वांना सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार कोकण रेल्वे मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेसची यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे. त्यामुळे ही गाडी लवकरच कोकण रेल्वे मार्गावर धावणार आहे. संपूर्ण वातानुकुलित गाडी आहे.

Hair Growth: केस गळतीमुळे त्रस्त आहात? एकदा नक्की वापरून पाहा 'हे' जादुई तेल...

पंतप्रधान मोदी यांच्या सभेत झालेल्या गोंधळावर जयंत पाटील यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

Mahayuti Sabha: आज महायुतीची जाहीरसभा! पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकाच मंचावर

Sanjay Raut : फक्त आमची सभा होऊ नये म्हणून प्रधानमंत्र्यांना बोलवण्यात आलं

Sanjay Raut : प्रधानमंत्री मुंबईत येऊन 25 - 30 सभा घेतात, मग तुम्ही 10 वर्ष काहीच काम केलं नाही ना