पावसाने सकाळपासून जोरदार बॅटींग करत आहे. राज्यात पावसाने हाहा:कार मांडला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी गंभीर घटना घडल्या आहेत. विरारमध्ये आज दुपारी 3 वाजता एका घराचा स्लॅबचं प्लास्टर कोसळलं आहे. गोपचरपाडा परिसरातील पूजा अपारमेंटमधील रूम नंबर 335 मध्ये ही दुर्दैवी घटना घडली आहे. यामध्ये एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. लक्ष्मी राजू सिंग असे मयत झालेल्या महिलेचे नाव असून, त्याच्या डोक्यावर स्लॅब पडला. लक्ष्मी राजू सिंग असे मयत झालेल्या महिलेचे नाव असून, ती आपल्या दोन मुलासह घरात झोपली असता ही घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच, वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळावर पोहचून मयत महिलेसह तिच्या मुलांना बाहेर काढले आहे. ज्या इमारतीत ही घटना घडली ती इमारत 30 वर्षे जुनी होती. त्यामुळे वसई विरारमधील जर्जर आणि अतिधोकायड इमारतीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.