संगमनेरच्या धांदरफळ खुर्द येथे माजी खासदार सुजय विखे यांनी महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सभेचे आयोजन केले होते. यावेळी या प्रचारार्थ सभेत बोलताना वसंतराव देशमुख यांनी युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉक्टर जयश्री थोरात यांच्याबद्दल अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्य केले.
वसंतराव देशमुख यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे संगमनेरमध्ये तणावाचे वातावरण पाहायला मिळाले. काँग्रेस कार्यकर्त्यांकडून दगडफेक आणि वाहनांची जाळपोळ करण्यात आली.
याच पार्श्वभूमीवर आता जयश्री थोरातांवर टीका करणारे वसंत देशमुखांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. वसंतराव देशमुखांना रात्री पुण्यातून संगमनेरमध्ये आणण्यात आलं. त्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.