ताज्या बातम्या

भाजप कार्यकर्त्याची बाळासाहेब थोरातांच्या मुलीबाबत बोलताना जीभ घसरली; संगमनेरमध्ये तणावाचे वातावरण

काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.

Published by : Siddhi Naringrekar

आदेश वाकळे, संगमनेर

संगमनेरच्या धांदरफळ खुर्द येथे माजी खासदार सुजय विखे यांनी महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सभेचे आयोजन केले होते. यावेळी या प्रचारार्थ सभेत बोलताना वसंतराव देशमुख यांनी युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉक्टर जयश्रीताई थोरात यांच्याबद्दल अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्य केले.

वसंतराव देशमुख यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे आता संगमनेरमध्ये तणावाचे वातावरण आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांकडून दगडफेक आणि वाहनांची जाळपोळ करण्यात आली. त्यानंतर महिला भगिनींचा अपमान केल्याने स्थानिक महिला एकत्र येत सभास्थळी ठीय्या सुरू केला.

धांदरफळ गावात तणावपूर्ण वातावरण असून पोलीस घटनास्थळी पोहचले आहेत. भाजपचे वसंत देशमुख यांच्या वक्तव्याचा महिलांकडून निषेध व्यक्त केला जात असून राजकीय वर्तुळातून यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. वसंतराव देशमुख यांनी केलेल्या वक्तव्यानंतर काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : मामा राजवाडेंचा भाजप पक्षप्रवेश थांबवला

Ashadhi Wari 2025 : वारीसाठी ST महामंडळाचे विशेष नियोजन; बीडमार्गे पंढरपूरकडे 800 विशेष बसेस

Rapido Bike : रॅपिडो बाईकला खुद्द परिवहन मंत्र्यांनी पकडले; परिवहन विभागाकडून मंत्र्यांना खोटी माहिती

Sonu Sood : "तुम्ही नंबर पाठवा..."; लातूरमधील 'त्या' शेतकरी कुटुंबाला सोनू सूदचा मदतीचा हात