वाशिमच्या भाजीमंडीमध्ये भाजीपाल्याचे दर गगनाला भिडले. भाजी घेण्यासाठी आलेल्या सर्वसामान्य नागरिकांना दरवाढीचा फटका बसला आहे. टोमॅटो दर 100 रुपये किलो, तर वाटाणा 200 रुपये किलोवर पोहोचला आहे. दुसरीकडे मात्र शेतकऱ्यांनी पिकविलेल्या भाजीपाल्याला चांगला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी म्हणावी लागेल.
भाजी घेण्यासाठी आलेल्या नागरिकांच्या खिशाला मात्र कात्री बसत असल्याच चित्र पाहायला मिळत आहे. सलग सुरू असलेल्या पावसामुळे भाजीपाल्याच्या आवकवर चांगलाच परिणाम झाल्याचं दिसत आहे. शेतातून भाजीपाला भाजीमंडित कमी प्रमाणात येत असल्याने सद्या भाजीपाला दरात वाढ झाली आहे.