Satish Shah Dead News : भारतीय विनोदी विश्वात आपला स्वतंत्र ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह Satish Shah यांचे निधन झाले आहे. शनिवारी, 25 ऑक्टोबर रोजी दुपारी साधारण 2:30 वाजता मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात Hinduja Hospital त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 74 वर्षांचे होते.
गेल्या काही महिन्यांपासून सतीश शाह यांची प्रकृती साथ देत नव्हती. किडनीसंबंधित गंभीर त्रासामुळे त्यांच्यावर अलीकडेच किडनी ट्रान्सप्लांट करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांची प्रकृती बिघडली आणि त्यांचे निधन झाले. त्यांच्या व्यवस्थापकाने त्यांच्या मृत्यूची अधिकृत पुष्टी केली आहे.
सतीश शाह यांनी ‘साराभाई वर्सेस साराभाई’ मालिकेतील इंद्रवदन साराभाई, ‘मैन हू ना’ मधील प्राचार्य, आणि ‘जाने भी दो यारो’ सारख्या कल्ट चित्रपटांमधील भूमिकांमुळे प्रेक्षकांच्या मनावर अमिट छाप सोडली होती. टेलिव्हिजन आणि हिंदी सिनेमात एकाच वेळी प्रचंड यश मिळवणाऱ्या मोजक्या कलाकारांपैकी ते एक होते.
त्यांचे पार्थिव सध्या हिंदुजा रुग्णालयात ठेवण्यात आले असून रविवारी त्यांच्या अंत्यसंस्काराची तयारी केली जात आहे. मनोरंजन क्षेत्रातून अनेक कलाकार व चाहत्यांनी सोशल मीडियावर दुःख व्यक्त करत, त्यांच्या उत्तम अभिनयाची आणि मनमिळावू स्वभावाची आठवण काढली आहे.