टॉलिवूडच्या सिनेसृष्टीतून एक दुःखद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध प्रॉडक्शन डिझायनर के. शेखर यांचे वयाच्या 72 व्या वर्षी निधन झाले. त्यांनी तिरूअनंतपुरममधील त्यांच्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. केरळ कौमुदीच्या रिपोर्टनुसार, के. शेखर यांच्या कुटुंबाने त्यांच्या निधनाची पुष्टी केली आहे. के. शेखर यांच्या निधनाने मल्याळम सिनेसृष्टीत शोकाची लाट पसरली आहे.
के. शेखर यांना त्यांच्या अद्भुत कल्पनाशक्ती आणि आकर्षक सेट डिझाइनसाठी ओळखले जात होते. त्यांनी मल्याळम सिनेसृष्टीतील अनेक चित्रपटांसाठी अद्वितीय सेट डिझाइन केले आहेत. त्यांच्या योगदानामुळे चित्रपटांच्या सेट्सना एक वेगळाच आयाम प्राप्त झाला होता.
त्यांना विशेषत: आर्ट डायरेक्टर आणि प्रॉडक्शन डिझायनर म्हणून ओळखले जात होते. 'माय डिअर कुट्टीचाथन' हा चित्रपट त्यांचे एक प्रमुख काम होता. या चित्रपटाच्या सेट्ससाठी के. शेखर यांनी केलेल्या कामाचे सर्वत्र कौतुक झाले होते. तसेच 'अलिप्पझम पेरूक्कान' गाण्यातील अँटी-ग्रॅव्हिटी रूम ही त्यांची एक खास संकल्पना होती. या खोलीला फिरत्या स्टील रिगवर बांधण्यात आले होते, ज्यामुळे कॅमेरा स्थिर ठेवून कलाकार हवेत तरंगताना दिसत होते.
के. शेखर यांचा हा तंत्र भारतीय चित्रपटसृष्टीसाठी एक आदर्श ठरला होता. 1980 च्या दशकात त्यांनी हे तंत्र वापरले होते, जे आज अनेक चित्रपटांमध्ये दिसते. '2001: अ स्पेस ओडिसी' या चित्रपटातून या तंत्राची प्रेरणा घेतल्याचे ते सांगत. 26 वर्षांपूर्वी सीजीच्या सहाय्यांशिवाय त्यांनी या तंत्राचा वापर केला होता, जे आजच्या काळात खूप लोकप्रिय झाले आहे.
के. शेखर यांनी 1980 मध्ये मल्याळम चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. त्यांचा पहिला चित्रपट 'पदयोत्तम' होता, ज्यामध्ये त्यांनी कॉस्ट्यूम डिझायनिंग आणि पब्लिसिटी डिझायनर म्हणून काम केले. त्यानंतर त्यांनी 'नोक्केथाधूरथु कन्नूम नट्टू' आणि 'ओन्नू मुथल पूजाम वारे' यांसारख्या चित्रपटांसाठी देखील काम केले.
'माय डिअर कुट्टीचाथन' बाबत के. शेखर यांनी एका मुलाखतीत सांगितले होते, "सेट्स जेव्हा फिरत होते, तेव्हा ते मला खूप आवडले. असं दुसरं चित्रपट भारतात कधी बनवला जाईल, असं मला वाटत नाही." त्यांचे काम आणि कल्पनाशक्ती आजही निर्मात्यांना प्रेरणा देत आहे. त्यांचे योगदान आणि विचार सिनेमाच्या माध्यमातून नेहमीच जिवंत राहतील. के. शेखर यांच्या निधनाने सिनेसृष्टीत शोक व्यक्त केला जात असून, अनेक दिग्गज कलाकारांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे.
थोडक्यात
टॉलिवूडच्या सिनेसृष्टीतून दुःखद बातमी – के. शेखर यांचे वयाच्या 72 व्या वर्षी निधन.
के. शेखर यांनी तिरूअनंतपुरममधील त्यांच्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला.
केरळ कौमुदीच्या रिपोर्टनुसार, के. शेखर यांच्या कुटुंबाने त्यांच्या निधनाची पुष्टी केली.
के. शेखर यांच्या निधनाने मल्याळम सिनेसृष्टीत शोकाची लाट पसरली आहे.