ताज्या बातम्या

कतरिना–विक्कींचा गोड सरप्राईज! बाळाचं नाव जाहीर, पहिली झलक पाहून चाहते भारावले

7 नोव्हेंबर 2025 रोजी हे दोघे पालक झाले होते. आता जवळपास दोन महिन्यांनंतर त्यांनी आपल्या बाळाचं नाव चाहत्यांसमोर उघड केलं आहे.

Published by : Riddhi Vanne

Vicky Kaushal Katrina Kaif anVicky Kaushal Katrina Kaif announce baby boy name: बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडी विकी कौशल आणि कतरिना कैफ यांच्या आयुष्यात आनंदाचा नवा अध्याय सुरू झाला आहे. 7 नोव्हेंबर 2025 रोजी हे दोघे पालक झाले होते. आता जवळपास दोन महिन्यांनंतर त्यांनी आपल्या बाळाचं नाव चाहत्यांसमोर उघड केलं आहे.

सोशल मीडियावर बाळाची हलकीशी झलक शेअर करत त्यांनी आपल्या मुलाचं नाव विहान कौशल असल्याचं सांगितलं. या भावूक पोस्टमध्ये त्यांनी बाळाच्या आगमनामुळे आयुष्य अधिक सुंदर झाल्याची भावना व्यक्त केली आहे. फोटोमध्ये आई-वडील बाळाचा छोटासा हात प्रेमाने धरताना दिसत आहेत.

ही पोस्ट काही वेळातच व्हायरल झाली असून अनेक कलाकार आणि चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.विहान या नावाचा अर्थ पहाट, नवा प्रकाश आणि नव्या सुरुवातीचं प्रतीक असा होतो. 2021 मध्ये विवाहबंधनात अडकलेल्या विकी-कतरिनासाठी हे वर्ष खास ठरलं आहे. करिअरमधील यशासोबतच आता त्यांच्या कुटुंबातही आनंदाची भर पडली आहे.

थोडक्यात

  • बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडी विकी कौशल आणि कतरिना कैफ यांच्या आयुष्यात आनंदाचा नवा अध्याय

  • 7 नोव्हेंबर 2025 रोजी विकी–कतरिना पालक झाले

  • या गोड बातमीने चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं

  • जवळपास दोन महिन्यांनंतर दोघांनी आपल्या बाळाचं नाव जाहीर केलं

  • बाळाचं नाव उघड होताच सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव झाला

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा