ताज्या बातम्या

अंगठा कपाळाला टेकला पण तो पायाचा...; असे म्हणत देवेंद्र फडणवीस भावूक

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज जळगावच्या दौऱ्यावर होते.

Published by : Siddhi Naringrekar

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज जळगावच्या दौऱ्यावर होते. जळगावमधल्या दिव्यांग शाळेला देवेंद्र फडणवीसांनी भेट दिली. उपमुख्यमंत्री फडणवीसांना एका दिव्यांग मुलीनं पायानं टिळा लावला. तसंच पायानं ताट धरत त्यांचं औक्षणही केलं.

हे सर्व पाहताना देवेंद्र फडणवीस यांच्या डोळ्यातही पाणी आलं. याचा व्हिडिओ त्यांनी सोशल मिडियावर शेअर केला आहे. ट्विट करत फडणवीसांनी लिहिलं की, 'आजवर कितीतरी माता-भगिनींनी मला ओवाळलं. कपाळावर आशीर्वादाचा गंध लावला. आजही त्याच भावनेनं अंगठा कपाळाला टेकला पण तो पायाचा... हाताचा नव्हे. आयुष्यात असे हे क्षण येतात आणि आतून-बाहेरून मन थरारतं. अंगावर रोमांच उभे राहतात. डोळ्यांच्या कडा ओलावतात पण क्षणभरच. कारण पायाच्या अंगठ्यानं टिळा लावणाऱ्या, त्याचं पायानं आरतीचं तबक ओवाळणाऱ्या, त्या दिव्यांग भगिनीच्या चेहऱ्यावर हास्य फुललेलं होतं. तिच्या नजरेतली चमक आणि धमक जणू नियतीला आव्हान देत म्हणत होती की "तू काय मला हरवणार? मला कोणाची सहानुभूती नको, दया नको. मी खंबीर आहे." ते पाहून मी इतकंच म्हणालो, "ताई, तू लढत राहा. आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत." या भगिनीकडून ऊर्जा आणि प्रेरणा घेताना कुसुमाग्रज आठवले - "अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा किनारा तुला पामराला!" असे फडणवीस यांनी लिहिलं आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे तांदळाची पेज; जाणून घ्या फायदे

Sanjay Raut On IND-PAK Match : पाकिस्तानला आर्थिकदृष्ट्या सक्षम केलं' भारत-पाक सामन्यावर संजय राऊतांचा संताप

Latest Marathi News Update live : जालन्यात बंजारा समाजाचा मोर्चा

India- Pakistan Match : भारताचा पाकिस्तानवर विजय, पण हस्तांदोलन टाळून खेळाडूंनी दिला ठाम संदेश