ताज्या बातम्या

Vidhan Parishad Election : सर्व आमदारांचे मतदान पूर्ण

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : विधान परिषद निवडणुकीसाठी सर्व आमदारांचे मतदान पूर्ण झाले असून 5 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. यामुळे सर्वच उमेदवारांची धाकधूक आता वाढली आहे. कोण होणार विजयी, याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.

विधान परिषदेच्या 10 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात असून महाविकास आघाडीकडून 6 तर भाजपकडून 5 उमेदवार लढत आहेत. भाजप विरुध्द महाविकास असा थेट सामाना रंगला आहे. विधान परिषदेसाठी सर्व आमदारांचे मतदान पूर्ण झाले असून 285 आमदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. आता 5 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. यामुळे उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. तर, तिसऱ्या पसंतीचे मत काँग्रेसच्या उमेदवाराचा विजय ठरवणार आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार

भाजप : प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारती, उमा खापरे, प्रशांत लाड

राष्ट्रवादी कॉंग्रेस : एकनाथ खडसे, रामराजे निंबाळकर

शिवसेना : सचिन अहिर आणि आमशा पाडवी

कॉंग्रेस : भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे

कान्समध्ये "हजारवेळा शोले पाहिलेला माणूस" चित्रपटाचा बोलबाला

पाण्यासाठी मराठवाड्यातील शेतकरी आक्रमक; पाटबंधारे कार्यालयासमोर शेतकऱ्यांचं आंदोलन

12th HSC Result : बारावीच्या परीक्षेचा आज निकाल; दुपारी 1 वाजता पाहता येणार ऑनलाईन निकाल

निवडणूक आयोगाला फटकारणाऱ्या उद्धव ठाकरेंना उपमुख्यमंत्री फडणवीसांचं चोख प्रत्युत्तर, ट्वीटरवर म्हणाले, "त्यांचा पराभव स्पष्टपणे..."

Daily Horoscope 21 May 2024 Rashi Bhavishya : 'या' राशींच्या लोकांच्या धन-संपत्तीत होणार बक्कळ वाढ; पाहा तुमचे भविष्य