Rahul Narvekar Exclusive Interview 
ताज्या बातम्या

Rahul Narvekar: विरोधी पक्षनेतेपद, आमदार अपात्रता, आरक्षणावर काय म्हणाले नार्वेकर?

विरोधी पक्षनेतेपदावर विधानसभेच्या नियमानुसार निर्णय होईल. लोकशाही मराठीच्या क्रॉसफायर या विशेष कार्यक्रमात विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मोठं विधान केलं आहे.

Published by : Team Lokshahi

महाराष्ट्रात महायुतीची सत्तास्थापना झाल्यानंतर विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यात आली. भाजप नेते आणि आमदार राहुल नार्वेकर यांची पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली. यामुळे विधानसभेच्या अध्यक्षपदी सलग दुसऱ्यांदा शपथ घेणारे महाराष्ट्रातील पहिले अध्यक्ष म्हणून त्यांची नोंद केली जाणार आहे. महाराष्ट्राचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची लोकशाही मराठीचे मॅनेजिंग एडिटर विशाल पाटील यांनी मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान विरोधी पक्षनेतेपद, आमदार अपात्रता, आरक्षणावर भाष्य केलं आहे.

राहुल नार्वेकर यांनी दुसऱ्यांदा विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी पुन्हा एकदा मिळाल्याबद्दल आभार मानले आहेत. संसदीय लोकशाही बळकट करणे ही विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्र विधानसभेच्या नियमानुसार विरोधी पक्षनेतेपदाबाबत निर्णय: नार्वेकर

हिवाळी अधिवेशन सोमवारपासून नागपूर येथे सुरू होणार आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेला अद्याप विरोधी पक्षनेता मिळाला नाही. महाविकास आघाडीकडून विरोधी पक्षनेता कोण असणार, याबाबत प्रश्नचिन्ह आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या नियमानुसार, प्रथा-परंपरेनुसार विरोधी पक्षनेत्याबाबत निर्णय घेतला जाईल. विरोधी पक्षनेतेपदासाठी अद्याप अर्जच आलेला नाही. अर्ज आल्यानंतर याबाबत विचार केला जाईल. अशी माहिती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली आहे.

कुलाब्यात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पायाभूत सुविधा आणणार

कुलाब्याला स्टेट कॅपिटलचा दर्जा मिळावा यासाठी विधानसभेत मागणी केल्याची माहिती राहुल नार्वेकर यांनी केली आहे. कुलाबा देशाची आर्ट डिस्ट्रिक्ट मानलं जातं. कुलाब्यात देशातील अनेक महत्त्वाच्या संस्थांचे हेडक्वॉटर्स आहेत. कुलाब्यात उच्च न्यायालय, मंत्रालय, विधीमंडळ तसेच अनेक महत्त्वाचे ऑफिसेस आहेत. त्या दृष्टीने येथे दळणवळणाची सेवा अधिक सक्षम करणार असल्याचं नार्वेकरांनी वक्तव्य केलं आहे.

विधानभवन परिसराचा कायापालट करणार: नार्वेकर

दिल्लीतील ‘सेेंट्रल विस्टा’च्या धर्तीवर विधानभवन परिसराचा पुढील दोन वर्षांत कायापालट करण्याचा संकल्प विधानसभेचे नवे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केला. यानुसार नवीन इमारतीची उभारणी, नागपूरमध्ये मध्यवर्ती सभागृह, कामकाज कागदविरहित करण्याची योजना त्यांनी मांडली आहे. नागपुरातही मध्यवर्ती सभागृह सुसज्ज करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

शिंदेंची शिवसेना हीच खरी शिवसेना, ठाकरेंचे आमदार पात्र कसे?

पक्षाचे चिन्ह, नाव कोण वापरणार हे ठरवण्याचा निर्णय निवडणूक आयोगाचा आहे. आमदार अपात्रतेबाबत घेतला निर्णय हा संपूर्ण पडताळणी करून घेतलेला शाश्वत निर्णय असल्याचं आपण ठामपणे सांगत असल्याचं नार्वेकर म्हणाले आहेत.

आदित्य ठाकरे यांच्यासोबत मैत्रीपूर्ण संबंध असल्याचं नार्वेकर यांनी म्हटलं आहे. तसेच बांगलादेशात होणाऱ्या हिंदुंवरील अत्याचाराबाबत बोलताना त्यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. देशामध्ये सेक्युलरिझमच्या नावाखाली मेजॉरिटीवर अत्याचार होत असेल, त्यांच्यावर अन्याय होऊ नये.

मराठा समाजाला टिकणारं आरक्षण द्यायचं आहे: नार्वेकर

मराठा आरक्षणासंदर्भात विधानसभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी प्रतिक्रिया दिली आहे. मराठा आरक्षण देण्यात अडचण नसल्याचं नार्वेकरांनी म्हटलं आहे. तसंच लोकांची फसवणूक करणारं नव्हे तर टिकणारं आरक्षण द्यायचं आहे, असंही त्यांनी लोकशाहीच्या क्रॉसफायर या कार्यक्रमात सांगितलं.

संपूर्ण मुलाखत पाहण्यासाठी क्लिक करा-

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा