Vijay Shivtare Latest News 
ताज्या बातम्या

विजय शिवतारे अपक्ष निवडणूक लढण्यावर ठाम, पत्रकार परिषदेत म्हणाले, "बारामतीत 'पवार' पर्व संपवायचंय..."

"राज्यात राजकीय चिखल झाला आहे. बारामतीत सुप्रिया सुळे यांनी २ टक्के कामही केलं नाही", विजय शिवतारेंचा राष्ट्रवादी काँग्रेसवर घणाघात.

Published by : Naresh Shende

Vijay Shivtare Press Conference : लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही गटात (अजित पवार विरुद्ध शरद पवार) राजकीय घमासान सुरु आहे. अशातच शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी या संघर्षात उडी घेतली आहे. विजय शिवतारे बारामतीतून अपक्ष निवडणूक लढण्यावर ठाम आहेत. पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत शिवतारेंनी अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. बारामती लोकसभेसाठी १२ एप्रिलला १२ वाजता मी फॉर्म भरणार आहे. मला बारामतीत 'पवार' पर्व संपवायचं आहे. राज्यात राजकीय चिखल झाला आहे. बारामतीत सुप्रिया सुळे यांनी २ टक्के कामही केलं नाही. दहशतवादाचा उगम शरद पवारांनी सुरु केला आहे. ४०-४० वर्ष पवारांनाच मतदान का द्यायचं? ही लढाई मला लढू द्या, माझी शिंदे-फडणवीसांना विनंती आहे, असं विजय शिवतारे पत्रकार परिषदेत म्हणाले.

विजय शिवतारे पत्रकार परिषदेत पुढे म्हणाले, या निवडणुकीतून माघार घेऊ नका, असं लोक मला सांगतात. ४ जूनला जनशक्तीची ताकद दिसेल. विंचू अनेकांना डसला आता महादेवाच्या पिंडीवर जाऊन बसा, असं म्हणत शिवतारे यांनी अजित पवारांवर हल्लाबोल केला. ते पुढे म्हणाले, अजित पवारांकडून स्वार्थी राजकारण सुरु आहे. शंका कुशंका बाजूला ठेवून मला साथ द्या. माझ्या भूमिकेकडे सध्या राज्याचं लक्ष आहे. पवारांमुळे जनतेच्या मनात भीती निर्माण झाली आहे. राष्ट्रवादीकडून राज्यात ग्रामीण दहशतवाद सुरु आहे.

जनतेसाठी फाशीवर जायलाही तयार आहे. पण माघार घेणार नाही. संग्राम थोपटेंचा कारखाना पवारांनी बंद पाडला. मतभेद असू शकतात, पण मनभेद नाही, शिंदेबद्दल आदर आहे. जनतेनं साथ दिल्याने मी आमदार झालो. बारामतीतून मी जिंकणारच. राष्ट्रवादीनं ग्रामिण दहशतवाद पोसला, माध्या जीवाशीही काही खेळ होऊ शकतो. माझी लढाई जनसामान्यांसाठी आहे. अजित पवारांचं स्वार्थी राजकारण सुरु आहे. १ एप्रिलला पुरंदरपासून प्रचाराचा नारळ फोडणार आहे, असंही शिवतारे म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : राज्यपाल आचार्य देवव्रत छत्रपती शिवाजी पार्कमध्ये

Acharya Devvrat : संस्कृतमधून शपथ घेतली, आता आचार्य देवव्रत यांच्यावर महाराष्ट्राची जबाबदारी

Asia Cup 2025 IND vs PAK : टीम इंडियावर मॅच रेफरी घेणार अ‍ॅक्शन? पाकिस्तान खेळाडूंशी हस्तांदोलन न करण खेळाडूंवर भोवणार, काय सांगतो ICC-ACC नियम

Waqf Amendment Bill : वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकातील तरतुदी, न्यायालयाची तात्पुरती स्थगिती