Vijay Wadettiwar  Lokshahi
ताज्या बातम्या

पूजा खेडकर प्रकरणावर विजय वडेट्टीवारांचं मोठं विधान; म्हणाले, "भाजप नेत्याच्या संस्थेला १२ लाखांची..."

विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर प्रकरणावर मोठी प्रतिक्रिया दिलीय.

Published by : Naresh Shende

Vijay Wadettiwar On IAS Pooja Khedkar: पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात गैरव्यवहाराचा आरोप असलेल्या प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्याबाबत नवनवीन माहिती समोर येत आहे. अशातच विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पूजा खेडकर प्रकरणावर मोठी प्रतिक्रिया दिलीय.पूजा खेडकर प्रकरण अत्यंत गंभीर आणि संवेदनशील आहे. पूजा खेडकरच्या आईनं एका भाजप नेत्याला त्याच्या संस्थेला चेकने १२ लाखाची देणगी दिल्याची माहिती उघड झाली आहे. आता भ्रष्टाचार कोण करतंय? हे उघड झालं आहे. त्या कुटुंबाला काहीतरी फायदा होईल, म्हणूनच चेकने पैसे दिले गेले आहेत. हा भ्रष्टाचार केला गेला आहे. याची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे, असं वडेट्टीवार म्हणाले.

पत्रकार परिषदते विजय वडेट्टीवार काय म्हणाले?

पूजा खेडकर प्रकरण अत्यंत गंभीर आणि संवेदनशील आहे. पूजा खेडकरच्या आईनं एका भाजप नेत्याला त्याच्या संस्थेला चेकने १२ लाखाची देणगी दिल्याची माहिती उघड झाली आहे. आता भ्रष्टाचार कोण करतंय? हे उघड झालं आहे. एकीकडे काँग्रेसला बदनाम करायचं आणि दुसरीकडे भ्रष्टाचाराला चालना द्यायची, हे महाराष्ट्राने बघितलं आहे. हे प्रकरण आता संवेदनशील झालं आहे. तै पैसे कशासाठी दिले? कोणता फायदा करण्यासाठी दिले? त्या कुटुंबाला काहीतरी फायदा होईल, म्हणूनच चेकने पैसे दिले गेले आहेत. हा भ्रष्टाचार केला गेला आहे. याची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे.

पूजा खेडकर प्रकरणात ज्या पद्धतीनं क्रिमीलेयर आणि मेडीकल सर्टिफिकेट जोडलं गेलं आहे, यामध्ये असलेलं तथ्य समोर आलं पाहिजे. या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. काही तथ्य आढळल्यास त्वरीत कारवाई झाली पाहिजे, अशी आमची मागणी आहे. एमएसपीच्या अहवालाबाबत बोलताना वडेट्टीवार म्हणाले, आमचे मुख्यमंत्री दिल्लीत जाऊन बसले होते. ते म्हणाले आम्ही एमएसपी वाढवून आणतो. पण महाराष्ट्रात आणि देशात एमएसपीचे जे दर वाढले आहेत, ते आता बाजरीला फक्त ७ टक्के, सोयाबीनला ६.५ टक्के, कापसाला ७ टक्के आहे. औषधे, किटकनाशक, खते, शेतीची अवजारे, ट्रॅक्टरवर जीएसटी लावला आहे. खतांचे, बियाणांचे दर ३८ टक्के वाढले आहेत. त्यामुळे शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Raj Thackeray : "कोण जैन लोक आहेत जी...", फडणवीसांच्या भेटीनंतर राज ठाकरेंची बेस्ट पतपेढी निवडणुकीच्या निकालासह अनेक मुद्द्यांवर प्रतिक्रिया

Latest Marathi News Update live : राज ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीसांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा

Gujrat Rain Update : गुजरातमध्ये समुद्र खवळला; तीन बोटी बुडाल्या

Chhatrapati Sambhajinagar : "काळजी घ्या" मृत्यूपूर्वी वडिलांना फोन! सिलेंडरमध्ये खुपसवली कात्री अन् स्फोटादरम्यान CA विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू