Vijay Wadettiwar Google
ताज्या बातम्या

Vijay Wadettiwar Tweet: "खोटं बोलताना थोडं..."; देवदर्शन योजनेवरून विजय वडेट्टीवारांचं CM शिंदेंवर शरसंधान

राज्य सरकारकडून देवदर्शन योजना सुरु करण्यात आल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं होतं. परंतु, या योजनेच्या माध्यमातून सत्ताधारी चुकीच्या पद्धतीनं जाहीरातबाजी करत असल्याचा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार केला आहे.

Published by : Naresh Shende

Vijay Wadettiwar On Cm Eknath Shinde : राज्य सरकारकडून देवदर्शन योजना सुरु करण्यात आल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं होतं. परंतु, या योजनेच्या माध्यमातून सत्ताधारी चुकीच्या पद्धतीनं जाहीरातबाजी करत असल्याचा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार केला आहे. विजय वडेट्टीवार यांनी ट्वीटरच्या माध्यमातून शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. देवदर्शन योजनेच्या जाहिरातीत मुख्यमंत्र्यांनी तीन वर्षांपूर्वी हरवलेले ज्येष्ठ नागरिक तांबे यांचा फोटो वापरल्याची धक्कादायक माहिती वडेट्टीवारांनी ट्वीटरवर दिली आहे. दरम्यान, या जाहीरातीबाबत राज्य सरकारने खुलासा केला आहे. शासकीय खात्यावरून कोणतीही पोस्ट करण्यात आली नाही, असं राज्य सरकारने स्पष्ट केलं आहे.

विजय वडेट्टीवार ट्वीटरवर काय म्हणाले?

सत्ताधाऱ्यांना जाहिरातीचा किती सोस आहे, याचे अजून एक उदाहरण. ज्येष्ठ नागरिकांना देवदर्शन घडवणारी योजना सरकारने आणली. मुख्यमंत्री वाजत गाजत योजनेची जाहिरात करतात. काम केलं असेल तर खुशाल जाहिरात करावी. परंतु खोटं बोलताना थोड भान ठेवायला हवं. देवदर्शन योजनेच्या जाहिरातीत मुख्यमंत्र्यांनी तीन वर्षांपूर्वी हरवलेले ज्येष्ठ नागरिक तांबे यांचा फोटो वापरल्याची ही बातमी अनेक प्रश्न निर्माण करत आहे. या जाहिरातीमुळे तांबे कुटुंबीयांना किती मनस्ताप होत असेल?

राज्यातील नागरिकांच्या फोटोंचा अवैधपणे वापर करणे हा किती मोठा गुन्हा आहे. इंटरनेट आणि सोशल मीडिया वरून व्यक्तीचे फोटो डाऊनलोड करणे आणि परवानगी शिवाय जाहिरातीत वापरणे ही गंभीर बाब आहे.महायुतीच्या योजना जश्या पोकळ आहे, तश्याच जाहिराती सुद्धा पोकळ आहे. काम न करताच खोटे फोटो वापरून प्रचार प्रसार करण्याचा ‘गुजरात मॉडेल’ मुख्यमंत्र्यांनी सोडावा.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Gaza Situation : अन्न-पाण्यासाठी झुंजताना शेकडो पॅलेस्टिनी नागरिकांचे बळी

Google Online Courses : गुगलच्या 'या' मोफत कोर्सेसमुळे करिअरमध्ये प्रगतीची संधी

Rohit Pawar On ED Action : '...आणि म्हणून माझ्या एकट्यावर EDची कारवाई केली' रोहित पवारांनी सगळंच सांगितलं

Sambhajiraje Chhatrapati : 'युनेस्को गडकिल्ल्यांचे ब्रँडींग करेल, जतन आपल्याला करायचंय'; छत्रपती संभाजीराजेंची प्रतिक्रिया