Vijay Wadettiwar 
ताज्या बातम्या

"कारवाईची भाषा वापरली जाते, पण सरकार..."; डोंबिवली MIDC स्फोटाच्या घटनेवरून वडेट्टीवारांनी सरकारला धरलं धारेवर

डोंबिवली एमआयडीसीत अमुदान कंपनीत बॉयलरचा स्फोट झाल्याने आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाला असून ६० जणांवर उपचार सुरु आहेत.

Published by : Naresh Shende

Vijay Wadettiwar Tweet On Dombivali MIDC Blast : डोंबिवली एमआयडीसीत अमुदान कंपनीत बॉयलरचा स्फोट झाल्याने आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू झाला असून ३८ जणांवर उपचार सुरु आहेत. एमआयडीसीतील फेज २ मध्ये मोठा स्फोट झाल्याने आगीचे प्रचंड लोळ आकाशात पसरले आहेत. स्फोटाची तीव्रता इतकी भीषण होती की, एमआयडीसी परिसरात असलेल्या इमारतींच्या काचाही फुटल्या. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमनदलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. या घटनेसंदर्भात काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी ट्वीट करत सरकारवर टीकास्त्र डागलं आहे.

ट्वीटरवर काय म्हणाले विजय वडेट्टीवार?

कल्याण-डोंबिवली येथील केमिकल कंपनीमध्ये स्फोट होऊन लागलेल्या भीषण आगीत ६ निष्पाप लोकांचा मृत्यू आणि ४८ लोक गंभीर जखमी झाल्याची घटना अत्यंत दुःखद आहे.स्फोटामुळे अनेक वाहनांचे व अनेक घरांचे नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे. डोंबिवली MIDC भागात स्फोट होवून होणाऱ्या दुर्घटना अनेकदा होत आहे.

दरवेळी चौकशी आणि कठोर कारवाईची भाषा वापरली जाते पण त्यानंतर सुद्धा कोणत्याही उपाययोजना सरकारकडून होत नाही. आज पुन्हा एकदा सहा लोकांना जीव गमवावा लागला आहे.आता तरी या दुर्घटनेला गांभीर्याने घेऊन सरकारने आवश्यक उपाययोजना करावी ही आमची मागणी आहे.

डोंबिवली एमआयडीसीत झाला मोठा स्फोट

डोंबिवलीच्या एमआयडीसीत एका कंपनीत मोठा स्फोट झाल्याची घटना घडलीय. एमआयडीसीच्या फेज- २ मध्ये हा स्फोट झाल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. स्फोटाची भीषणता इतकी गंभीर आहे की, आकाशात धुराचे लोट आणि आगीचे लोळ मोठ्या प्रमाणात पसरले आहेत. या स्फोटामुळे अनेक जण जखमी झाल्याचं समजते आहे. कंपनीत बॉयलरचा स्फोट झाल्याची माहिती समोर आलीय. या घटनेची माहिती मिळताच अग्नीशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आगीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करत आहेत. या स्फोटामुळे ८ जणांचा मृत्यू झाला असून ६० कामगार जखमी झाले आहेत. यापैकी २४ जणांना एम्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Pune : पुण्यातील कोथरूड गोळीबार प्रकरणातील पाच आरोपींना अटक

Asia Cup : भारत-पाकिस्तान सुपर-4 मध्ये पुन्हा आमनेसामने

Latest Marathi News Update live : राज्यात आज ॲलोपॅथी डॉक्टरांचा संप

EVM : आता ईव्हीएम मशीनवर दिसणार रंगीत छायाचित्र; केंद्रीय निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय