Vijay Wadettiwar  Lokshahi
ताज्या बातम्या

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वडेट्टीवारांचा राज ठाकरेंवर निशाणा, म्हणाले; "त्यांनी कितीही प्रयत्न केला, तरी..."

विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

Published by : Naresh Shende

Vijay Wadettiwar On Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीसाठी एकला चलो रे चा नारा दिला. मनसे २२५ ते २५० जागा विधानसभा निवडणुकीत लढविणार असल्याचं ठाकरेंनी जाहीर केलं. मनसेच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याला या निवडणुकीत निवडून आणायचं आहे, असा निर्धारही त्यांनी केला. याच पार्श्वभूमीवर विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

माध्यमांना प्रतिक्रिया देताना विजय वडेट्टीवार काय म्हणाले?

राज ठाकरेंवर बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले, कोणालाही आपला पक्ष वाढवण्याचं स्वातंत्र्य आहे. राज ठाकरेंचा पक्ष आहे. त्यांना स्वातंत्र्य आहे. महाराष्ट्रातील जनतेचा कौल महाविकास आघाडीच्या बाजूनं आहे. त्यामुळे त्यांनी कितीही प्रयत्न केला तरी यश येणार नाही. ते लढले पाहिजेत. प्रत्येक पक्षाला निवडणुकीमध्ये आपली ताकद दाखविण्याची संधी असते. त्यांची शक्ती सुद्धा महाराष्ट्रातील जनतेला कळेल. त्यांचं स्वागत आहे. विधानसभा निवडणुकांमध्ये राज ठाकरे यांच्या मनसेची शक्ती महाराष्ट्राच्या जनतेला कळेल आणि त्यांनाही त्याचे कारण कळेल, आमच्या त्यांना शुभेच्छा आहे.

राज्यात मुसळधार पाऊस पडल्यानं अनेक जिल्ह्यांमध्ये जनजीवन विस्कळीत झालं आहे. पावसानं थैमान घातल्यानं पूरसदृष्य परिस्थिती निर्माण झाली. रायगड कोल्हापूर, रत्गागिरी, पुण्यासह मुंबईला पावसानं झोडपलं. या अतिवृष्टीमुळं राज्यात पाच जणांचा मृत्यू झालाय. अशातच विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलताना मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

वडेट्टीवार म्हणाले,गेली दहा वर्ष आपण बघतो आहे की, पूर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कामंच झाली नाहीत. पूर्वीही पाऊस पडायचा, पण अशी परिस्थिती निर्माण होत नव्हती. ड्रेनेज सिस्टिम अपडेट करण्याची गरज आहे.लोकसंख्या आणि शहरीकरण वाढत आहे. सिमेंटचे रोड झाले आहेत. तसच ड्रेनेज सिस्टीमही नाही. त्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात पाणी साचतं आणि नुकसान होतं. अशीच परिस्थिती शेतकऱ्यांची आहे.

राज्यात पुराच्या पाण्यामुळे जवळपास २५ लोकांचा जीव गेला आहे. ५०० च्या वर जनावरं वाहून गेली आहेत. पूरानं इतकं भयानं रुप घेतलं आहे.जनावर वाहून गेले इतके भयान रूप या पुराच्या आहे. पुरग्रस्तांना नुकसान भरुपाई, खावटी म्हणून पाच हजार रुपये दिले पाहिजेत. पंचनामा करून शेतकऱ्यांना मदतीचा पॅकेज घोषित करावा, अशी आमची सरकारची मागणी आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Asia Cup 2025 PAK vs UAE : आधी पाकिस्तान-यूएई सामना चर्चेत, नंतर सामन्यादरम्यान पाकिस्तानचा खेळाडू आला चर्चेत; थेट अम्पायरलाच चेंडू मारला

मराठा आरक्षणाच्या लढ्यात मोठा विजय, हैदराबाद गॅझेटविरोधी याचिका फेटाळली

Smart Sunbai : शिवाजी दोलताडे दिग्दर्शित 'स्मार्ट सुनबाई'; 'या' तारखेला होणार प्रदर्शित

MP Dhananjay Mahadik : खूशखबर!, खासदार धनंजय महाडिक मोठी घोषणा; सरकारी दवाखान्यात जन्म घेणाऱ्या मुलींना मिळणार सोन्याचं 'हे' खास गिफ्ट