ताज्या बातम्या

Vijay Wadettiwar : सरकार - प्रशासन ‘AC’ मध्ये कूल, बियाण्यांसाठी शेतकऱ्यांची दिशाभूल

विजय वडेट्टीवार यांनी ट्विट केलं आहे.

Published by : Siddhi Naringrekar

विजय वडेट्टीवार यांनी एक ट्विट केलं आहे. विजय वडेट्टीवार यांनी ट्विट करत म्हटले आहे की, सरकार - प्रशासन ‘AC’ मध्ये कूल, बियाण्यांसाठी शेतकऱ्यांची दिशाभूल. अकोला जिल्ह्यात तापमानाचा पारा वाढला म्हणून कलम १४४ लागू करण्यात आली आहे. असे असतानाही प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे शेकडो शेतकऱ्यांना जीवघेण्या उन्हात बियाण्यांसाठी तासन्‌तास रांगेत ताटकळत ठेवले आहे.

शेतकरी कपाशीच्या बियाण्यांसाठी धडपड करीत आहे. रांगेत लागून बियाणे मिळविण्याचा प्रयत्न करतो आहे. कारण प्रश्न वर्षभराच्या जगण्याचा आहे. बाजारात शेतकऱ्यांना हव्या असलेल्या नेमक्या बियाण्यांचा तुटवडा आहे. तुटवडा असल्याचे कारण पुढे करून प्रत्येक शेतकऱ्याला केवळ दोन पाकिट देण्यात येत आहे. दहा-वीस एकराचा शेतकरी या दोन पाकीट बियाण्यांमध्ये पेरणी कशी करणार? सरकार आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चेही काढले. तक्रारी करण्यात आल्या. परंतु संवेदनशीलता हरविलेल्या राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेतली नाही.

यासोबतच ते पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांच्या संतापाचा कडेलोट होण्याची पुरती कल्पना असल्याने आता पोलिस संरक्षणात बियाणे विक्री केली जात आहे. कंपनीने आता अधिकचा पुरवठा करू शकणार नाही, असे पत्रच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना पाठविले आहे. म्हणून दुसऱ्या कंपन्यांचे बियाणे खरेदी करण्यासाठी अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांवर दबाव टाकण्यात येत आहे. आम्ही दोन-दोन पक्ष कसे फोडले, गळ्याचा पट्टा कसा काढला, दादा-भाई वर अन्याय कसा झाला यासारख्या विषयांवर दिवसभर प्रतिक्रिया देत सुटणारे महायुतीतील नेते या शेतकऱ्यांच्या ह्या अवस्थेवर अजूनही गप्प आहेत. सत्तेचे गुऱ्हाळ चालविण्यात व्यस्त आहेत. असे विजय वडेट्टीवार म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Raj Thackeray : 'मला कोणतंही राजकीय विधान करायचं असेल तर...' राज ठाकरे पोस्ट करत नेमकं काय म्हणाले?

Latest Marathi News Update live : आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषद

Uttarakhand Pithoragarh Accident : उत्तराखंडातील पिथोरागडमध्ये भीषण अपघात; 8 जणांचा मृत्यू, 5 जखमी

Kiara Advani & Sidharth Malhotra : गुडन्यूज! सिद्धार्थ मल्होत्रा व कियारा अडवाणीला कन्यारत्न; चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव