करूरमध्ये 500 पोलिस कर्मचारी तैनात
विजयची सहा तास उशिरा एन्ट्री; तिप्पट गर्दी अन् चेंगराचेंगरी
चेंगराचेंगरी झाल्याने आतापर्यंत 39 जणांचा मृत्यू
सुपरस्टार अभिनेता आणि राजकारणी विजय यांच्या (Tamil Nadu Stampede) पक्षाकडून तमिळनाडूतील करुर येथे 27 सप्टेंबर रोजी एक सभा आयोजित करण्यात आली होती मात्र या सभेत अचानक चेंगराचेंगरी झाल्याने आतापर्यंत 39 जणांचा मृत्यू झाला आहे. 16 महिला आणि 10 मुलांचा यामध्ये समावेश आहे. तर अनेक जण जखमी झाले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहे. तर दुसरीकडे सभेत चेंगराचेंगरी का झाली याबाबत कोणतीही अधिकृत माहिती सध्या समोर आलेली नाही मात्र या सभेत सुपरस्टार अभिनेता आणि राजकारणी विजय नियोजित वेळेपेक्षा सहा तास उशिरा आल्याने सभेच्या ठिकाणी गर्दी वाढली आणि सभेच्या ठिकाणी अनेक जण बराच वेळ कडक उन्हात उभे राहिल्याने काही लोक बेशुद्ध पडले ज्यामुळे सभेत चेंगराचेंगरी झाली असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
तर या प्रकरणात तमिळनाडूचे कार्यवाहक डीजीपी जी. वेंकटरमण (G. Venkataraman) यांनी सांगितले की, रॅली आणि सभेसाठी दुपारी 3 ते रात्री 10 पर्यंत परवानगी देण्यात आली होती मात्र सकाळी 11 वाजेपासून या सभेसाठी गर्दी जमू लागली. तसेच विजय (Vijay) सभेच्या ठिकाणी 7.40 ला पोहचले तसेच पुरेसे अन्न किंवा पाण्याशिवाय तासन्तास वाट पाहत होते असं तामिळनाडूचे कार्यवाहक डीजीपी जी. वेंकटरमण यांनी सांगितले. तसेच आम्ही पोलिसांच्या उपाययोजनांचा आढावा घेतला. यापूर्वी टीव्हीकेच्या रॅलींमध्ये कमी गर्दी होती, परंतु यावेळी, गर्दी अपेक्षेपेक्षा खूपच जास्त होती.
करूरमध्ये मोठ्या मैदानाची आयोजकांनी विनंती केली होती आणि सुमारे 10,000 लोकांची अपेक्षा होती, परंतु सुमारे 27,000 लोक जमले होते. विजय ज्या प्रचारस्थळी जनतेला संबोधित करणार होते त्या ठिकाणी 500 हून अधिक पोलिस तैनात करण्यात आले होते अशी देखील माहिती त्यांनी दिली.
500 पोलिस कर्मचारी तैनात
पुढे डीजीपींनी सांगितले की, मृतांमध्ये 12 पुरुष, 16 महिला आणि 10 मुले (पाच मुले आणि पाच मुली) यांचा समावेश आहे. 500 हून अधिक पोलिस अभिनेता-राजकारणी विजय ज्या ठिकाणी गर्दीला संबोधित करणार होते त्या ठिकाणी अधिकारी तैनात करण्यात आले होते.
भुकेल्या आणि तहानलेल्या अवस्थेत वाट पाहत होते
नंदा कुमार या प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, “आम्ही स्वतः तिथे उपस्थित होतो. विजय सकाळी 11 वाजता येणार होता, पण तो खूप उशिरा पोहोचला. लोक मुलांसह आले होते, भुकेले आणि तहानलेले होते आणि विजयची एक झलक पाहण्यासाठी तासन्तास उभे राहिले होते. परिणामी, परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली.
चौकशी आयोग स्थापन
तर दुसरीकडे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन म्हणाले की, चेंगराचेंगरीची चौकशी करण्यासाठी सरकारने एक आयोग स्थापन केला आहे. त्याचे नेतृत्व निवृत्त न्यायाधीश अरुणा जगदीसन करणार आहे. त्यांनी मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 10 लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी 1 लाख रुपये भरपाई देण्याची घोषणा केली.”
गुन्हा दाखल
तामिळनाडू पोलिसांनी कार्यक्रमादरम्यान नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल टीव्हीकेचे करूर पश्चिम जिल्हा सचिव व्हीपी मथियाझगन यांच्याविरुद्ध चार कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई सुरु आहे.