ताज्या बातम्या

Maharashtra Local Body Election Result 2025 : विखे पाटलांनी गड राखला! राहाता नगरपालीकेवर एकहाती सत्ता

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता तालुका हा बालेकिल्ला मानला जातो. विखे पाटलांची येथे अनेक वर्षांपासून सत्ता आहे.

Published by : Varsha Bhasmare

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता तालुका हा बालेकिल्ला मानला जातो. विखे पाटलांची येथे अनेक वर्षांपासून सत्ता आहे. विखे पाटील कोणत्याही पक्षात राहिले तरी इथं कायमच विखे पाटील यांच्या मर्जीतील लोक निवडून येतात. आत पुन्हा एकदा विखे पाटलांनी राहताचा गड राखला असून राहाता नगर पालिका निवडणुकीत विखेंनी विरोधकांचा सुफडा साफ केला. राहाता नगरपालिकेत एकूण २० जागांसाठी मतदान झाले. येथे भाजप आणि शिवसेना शिंदे गुटाने यांच्या नेतृत्वाखाली एकत्र निवडणूक लढली होती. १९ नगरसेवक निवडणुकीत भाजप आणि सेनेचे निवडून आले आहेत. नगराध्यक्षपदी देखील भाजपचे स्वाधीन गाडेकर यांनीही नगराध्यक्षपद बहुमताने जिंकले आहे.

खरं तर, बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्यात नगर जिल्ह्यात रस्सीखेच सुरू आहे. राधाकृष्ण विखे पाटलांचे पुत्र आणि माजी खासदार सुजय विखे पाटील यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला होता. इथून शरद पवार गटाच्या निलेश लंकेंना निवडून आणण्यासाठी बाळासाहेब थोरातांनी संपूर्ण ताकद लावली होती. लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर विखे पाटलांनी संगमनेर विधानसभेत काढला होता. येथे बाळासाहेब थोरातांचा मोठा पराभव झाला होता.

त्यामुळे अनेक अर्थांनी यंदाची राहाता नगरपालिकेची निवडणूक महत्त्वाची ठरली आहे. येथे विधानसभेच्या पराभवाचा बदला घेतला जाण्याची शक्यता असल्याची चर्चा होती. मात्र विखे पाटलांनी आपला गड राखला आहे. राहत्यामधील २० पैकी १९ जागांवर भाजप- सेनेचे नगरसेवक निवडून आले आहेत. तर नगराध्यक्षपदी भाजपचे स्वाधीन गाडेकर बहुमताने विजयी झाले आहेत.

नेवासा नगरपंचायत निकाल

दुसरीकडे, नेवासा नगरपंचायत निवडणुकीत दणक्यात विजयी झाले आहेत. त्यांच्या नगरसेवकाला जास्त मते मिळाली असली तरी त्यांचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार पराभूत झाला आहे. त्यामुळे नेवासामध्ये गडाखांचा गड आला पण सिंह गेला, अशी स्थिती निर्माण झाली आहे. नेवासात 17 पैकी 10 जागा गडाखांच्या शेतकरी क्रांतीकारी पक्षाला मिळाल्या आहेत. तर 6 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले आहेत.एका जागेवर अपक्षांनी बाजी मारली आहे. मात्र नगराध्यक्ष पदी महायुतीचे डॉ करण सिंग घुले विजयी झाले आहेत. हा गडाखांना मोठा धक्का मानला जात आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा