दिल्ली येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरु होते. यावेळी अनेक राजकीय नेत्यांनीही हजेरी लावली होती. यावेळी नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरेंबद्दल एक धक्कादायक वक्तव्य केले. निलम गोऱ्हे म्हणाल्या की, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत दोन मर्सिडिज दिल्यानंतरच एक पद मिळतं. असे खळबळजनक विधान नीलम गोऱ्हे यांनी केलं आहे.
यावर आता राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत म्हटले की, नाशिकचे माजी महापौर आणि शिवसेनेचे स्थानिक नेते विनायक पांडे यांना जाऊन विचारा की, त्यांना उमेदवारी देण्यासाठी नीलम गोऱ्हे यांनी किती पैसे घेतले होते.
याच पार्श्वभूमीवर आता विनायक पांडे यांनी पत्रकार परिषद घेत निलम गोऱ्हे यांच्यावर आरोप केले आहेत. विनायक पांडे म्हणाले की, शिवसेना प्रमुख, उद्धव साहेबांनी कधीही माझ्याकडून पदासाठी 1 रुपया देखील मागितलेला नाही आहे. त्यांनी एवढे बघितलं की, चांगला काम करतो, डॅशिंग कार्यकर्ता आहे. म्हणून ते मला सतत ही पदं देत गेले. उद्धव साहेब आणि बाळासाहेब ठाकरेंनी मला शिवसेनेत भरभरुन दिलं. माझ्याकडून कधीही पैसा घेतला नाही. विधानसभेच्या निवडणुकीत या बाईने माझ्याकडून पैसे घेतलेत. मी पैसे पोहचवले तरी मला उमेदवारी नाही, माझ्याऐवजी अजय बोरस्तेंना उमेदवारी दिली.
माझ्यासारखे राज्यामध्ये अनेक प्रसंग आहेत. अनेक कार्यकर्ते पुढे येतील आणि सांगतील की, या बाईंनी काय काय केलं आहे. पुण्याचे अशोक हरनाळ जे गटनेते होते त्याचेसुद्धा ऐकलं. त्यांच्याकडूनसुद्धा अशाचप्रकारे पैसे घेतलं होते. दिल्लीत त्यांनी जो विषय मांडला तो मांडण्याचा ते व्यासपीठ नव्हते. ते मराठी साहित्य संमेलन होते. तिथे मराठी साहित्याविषयी आपली भूमिका मांडायला हवी होती. ती भूमिका त्या बाईला मांडता येत नाही. महाराष्ट्रातील अनेक नेते पुढे येतील. पैशाच्या व्यवहाराशिवाय गोऱ्हे कार्यकर्त्यांना न्याय द्यायची नाही. निलम गोऱ्हेंनी कार्यकर्त्यांकडून तिकीटासाठी पैसे घेतले. मातोश्री आमचं पवित्र स्थान आहे, तिथे अशा गोष्टी घडत नाहीत. असे विनायक पांडे म्हणाले.