ताज्या बातम्या

Vinayak Raut : जिंकण्याचे मताधिक्य अडीच लाखाचं असेल ही खात्री आहे

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत.

Published by : Siddhi Naringrekar

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. यातच विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विनायक राऊत म्हणाले की, मनामध्ये आनंद आहे लढण्याचा उत्साह आहे आणि जिंकण्याचा निश्चय आहे. जिंकण्याचे मताधिक्य अडीच लाखाचं असेल ही खात्री आहे.

हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे खऱ्या अर्थाने माझ्या लोकशाहीतलं दैवत आहे. माझे यश हे माझे नाही आहे हे यश हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे आहे. माननीय उद्धवजी ठाकरेंचं यश आहे, आदित्य ठाकरेंचं यश आहे. कोकणामधील जनता ही उद्धवजी ठाकरेंवर किंवा बाळासाहेबांवर प्रेम करणार आहे. भारतीय जनता पक्षाने ज्या पद्धतीने उद्धवजी ठाकरेंना संपवण्याचे कपट कारस्थान रचलं.

यासोबतच विनायक राऊत पुढे म्हणाले की, आताच्या परिस्थितीमध्ये उद्धवजींना साथ देणारी ही मशाल आहे. ही जगदंबेची मशाल आहे. याची जाणीवसुद्धा आमच्या कोकणवासियांना असल्यामुळे आम्ही निश्चिंत आहोत. मशाल चिन्ह घराघरांमध्ये पोहचले आहे. आव्हान मुळीच समजत नाही. परंतु कोणी जरी असलं तरी आपल्याला कठीण परिस्थितीमध्ये प्रयत्न करुन यश संपादन करायचे आहे. असे विनायक राऊत म्हणाले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा