प्रसिद्ध रॉक बँड कोल्डप्लेच्या अमेरिका दौऱ्यातील एका कॉन्सर्टमध्ये संगीताच्या सुरांनी जितकी रंगत आणली, त्यापेक्षा जास्त गाजलं ते एका खासगी क्षणामुळे. AstroNURM या अमेरिकन टेक स्टार्टअप कंपनीचे CEO अँडी बायरन आणि त्यांच्या कंपनीतील HR प्रमुख क्रिस्टिन कॅबोट यांचा रोमान्स स्टेडियमच्या ‘किस कॅम’वर कैद झाला आणि संपूर्ण सोशल मीडियावर वादळ उठवलं.
कॉन्सर्टमध्ये ‘लाईव्ह’ रोमान्सची झलक
फॉक्सबरो, मॅसेच्युसेट्स येथील कोल्डप्लेच्या कॉन्सर्टमध्ये हा प्रकार घडला. स्टेडियममधील ‘किस कॅम’ने जेव्हा एका प्रेमळ जोडप्याला दाखवलं, तेव्हा उपस्थितांमध्ये हास्य आणि आश्चर्याचं मिश्र वातावरण होतं. पण हे क्षण कॅमेऱ्यात कैद झाले आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. काही वेळातच हे दोघं ओळखले गेले – CEO अँडी बायरन आणि HR हेड क्रिस्टिन कॅबोट.
विवाहबाह्य संबंधांची चर्चा
हे विशेष म्हणजे दोघंही विवाहित असूनही एकमेकांच्या प्रेमसंबंधांत असल्याचं या व्हिडीओमुळे उघड झालं. संगीताच्या तालावर हरवलेलं हे जोडपं एकमेकांच्या मिठीत रमलेलं दिसल्यामुळे सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया उमटल्या. काहींनी यावर उघडपणे टीका केली, तर काहींनी विनोदी मीम्सच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया नोंदवली.
खोटा 'माफीनामा' आणि सोशल मीडियाची चुकीची सवय
या घटनेला आणखी वळण मिळालं जेव्हा सोशल मीडियावर अँडी बायरन यांच्या नावाने एक 'माफीनामा' व्हायरल झाला. या बनावट पोस्टमध्ये "खरं प्रेम, चुकीचा क्षण" अशा भावनिक ओळी होत्या. ही पोस्ट इतकी पसरली की अनेक नामवंत मीडियांनीही ती खरी समजून प्रसिद्ध केली. मात्र, ही पोस्ट Peter Enis CBS News (@PeterEnisCBS) या विनोदी पॅरडी अकाउंटवरून करण्यात आली होती, याचा उलगडा झाल्यावर अनेकांना धक्का बसला. AstroNURM कंपनीच्या प्रवक्त्या टेलर जोन्स यांनी Men’s Journal या मीडियाला प्रतिक्रिया देताना स्पष्ट केलं, “ही पोस्ट अधिकृत नाही, ती बनावट आहे.”
माजी CEO चा खुलासा
या प्रकरणात आणखी एक गैरसमज निर्माण झाला – AstroNURM चे माजी CEO राय वॉकर यांच्या नावानेही एक खोटं विधान व्हायरल झालं. खुद्द राय वॉकर यांनी सोशल मीडियावर खुलासा करत सांगितलं, “मी 2022 पासून कंपनीत नाही आणि या प्रकरणाशी माझा काही संबंध नाही. हे सर्व हास्यस्पद आहे.”
व्यक्तिगत आयुष्यावर परिणाम
हा प्रसंग केवळ व्यावसायिक जीवनापुरताच मर्यादित राहिला नाही. अँडी बायरन यांच्या पत्नी मेगन केरिगन बायरन यांनी आपले सर्व सोशल मीडिया अकाउंट्स डिलीट केल्याची माहिती समोर आली आहे. बायरन दाम्पत्य सध्या Northborough, Massachusetts येथे राहत असून त्यांना दोन लहान मुले आहेत. त्याचप्रमाणे, क्रिस्टिन कॅबोट यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयीही चर्चा सुरु झाली आहे. New York Post च्या माहितीनुसार, त्यांचा घटस्फोट 2022 मध्ये केनेथ थॉर्नबी यांच्याशी झाला होता.
'ColdplayGate' ट्रेंड आणि समाजमाध्यमांची भूमिका
या सर्व प्रकरणामुळे ‘#ColdplayGate’ हा हॅशटॅग सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागला. अनेकांनी या घटनेचा विनोदी अंगाने समाचार घेतला, तर काहींनी प्रामाणिकपणे वैयक्तिक गोष्टींचं अशा पद्धतीने जनतेसमोर येणं चुकीचं असल्याचं मत मांडलं.