Virat Kohli Viral Video
Virat Kohli Viral Video 
ताज्या बातम्या

बुम बुम बुमराह! RCB विरोधात पंजा उघडला, ईशानने घेतला कोहलीचा जबरदस्त झेल, व्हिडीओ एकदा पाहाच

Published by : Naresh Shende

Virat Kohli Catch Viral Video : मैदानात मुंबई इंडियन्सची पलटण समोर असल्यावर विराट कोहलीचं आक्रमक रुप नेहमीच पाहायला मिळतं, असं त्याचे चाहते सांगतात. परंतु, आजच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा हुकमी एक्का जसप्रीत बुमराहने विराटला स्वस्तात माघारी पाठवलं आणि आरसीबीच्या चाहत्यांना एकच धक्का बसला. ९ चेंडू खेळून अवघ्या ३ धावा करणारा विराट मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाला. बॅटची कडा लागल्याने चेंडू मागच्या दिशेनं गेला अ्न विकेटकिपर ईशान किशनने हवेत उडी मारून विराटचा अप्रतिम झेल पकडला. ईशानच्या या जबरदस्त क्षेत्ररक्षणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. तर जसप्रीत बुमराहने आरसीबीविरोधात भेदक गोलंदाजी करून पंजा उघडला. बुमराहने पाच विकेट्स घेतल्याने आरसीबीच्या धावसंख्या मंदावली होती. पण दिनेश कार्तिकच्या (२३ चेंडूत ५३ धावा) धडाकेबाज फलंदाजीमुळं आरसीबीने २० षटकांत ८ विकेट्स गमावून १९६ धावांपर्यंत मजल मारली.

आयपीएलचा २५ वा सामना मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात वानखेडे स्टेडियममध्ये रंगत आहे. यंदाच्या हंगामात धावांचा पाऊस पाडून ऑरेंज कॅपचा मानकरी ठरलेल्या विराट कोहलीवर आजच्या सामन्यात तमाम क्रिडाप्रेमींच्या नजरा लागल्या होत्या. परंतु, बुमराहने विराटला बाद करून चाहत्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरलं.

यंदाच्या आयपीएल हंगामात विराट कोहलीने धडाकेबाज फलंदाजी करून धावांचा पाऊस पाडलाय. पाच सामन्यांमध्ये ३०० हून अधिक धावा करून विराटने प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांची पुरती दमछाक केली आहे. यामध्ये एक शतक आणि दोन अर्धशतकांचा समावेश आहे. १४६ च्या स्ट्राईक रेटने धावा करणाऱ्या विराटने टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे. विराटने राजस्थान रॉयल्सविरोधात ६७ चेंडूत १०० धावा केल्या होत्या. त्यामुळे विराटवर धीम्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केल्याचा सूर टीकाकारांनी आवळला होता.

IPL 2024 : रोहित शर्मा मुंबई इंडियन्समधून बाहेर पडणार? MI च्या मुख्य प्रशिक्षकाला हिटमॅनने स्पष्टच सांगितलं, म्हणाला...

"उबाठा पक्ष काँग्रेसमध्ये आधीच विलीन झालाय"; उद्योगमंत्री उदय सामंत यांचा मोठा दावा

टी-२० वर्ल्डकपआधी कर्णधार रोहित शर्माचं फॉर्मबाबत मोठं विधानं; म्हणाला,"फलंदाज म्हणून मला..."

"मुंबई आणि महाराष्ट्राचं वैभव लुटणाऱ्यांना आम्हाला गाडायचंय"; उद्धव ठाकरेंचा PM मोदी आणि अमित शहांवर निशाणा

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात गेल्यावर कसा अनुभव येतो? लोकशाहीशी बोलताना आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...