Team India Latest News Update
Team India Latest News Update 
ताज्या बातम्या

टी-२० वर्ल्डकपमध्ये रोहित शर्मासोबत 'हा' खेळाडू उतरणार सलामीला, माजी क्रिकेटर म्हणाला...

Published by : Naresh Shende

टीम इंडियाचा माजी क्रिकेटर मोहम्मद कैफने टी-२० वर्ल्डकपबाबत मोठी भविष्यवाणी केली आहे. वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाची सलामीची जोडी कोण असणार, याबाबत कैफने मोठी प्रतिक्रिया दिलीय. यंदाच्या टी-२० वर्ल्डकपमध्ये रोहित शर्मासोबत विराट कोहली सलामीला उतरणार आहे, असं कैफने म्हटलं आहे.

आयपीएल संपल्यानंतर टीम इंडिया टी-२० वर्ल्डकप टूर्नामेंट खेळणार आहे. भारताकडे रोहित शर्मासोबत सलामीला उतरण्यासाठी अनेक फलंदाजांचे विकल्प आहेत. कर्णधार रोहित शर्माशिवाय यशस्वी जैस्वाल, इशान किशन आणि शुबमन गीलसारखे सलामीचे फलंदाज टीम इंडियात आहेत. विराट कोहलीच्या टी-२० आकड्यांबद्दल बोलायचं झालं तर, विराटने सलामी करूनच सर्वात जास्त धावा कुटल्या आहेत. सलामी करताना विराट कोहलीचा विक्रम खूप चांगला आहे.

विराटच्या या चमकदार कामगिरीकडे पाहता मोहम्मद कैफने त्याच्याबद्दल मोठं विधान केलं आहे. टी-२० वर्ल्डकपमध्ये विराट कोहली ओपनिंग करणार असल्याचं भाकीत केलं आहे. स्टार स्पोर्ट्सवर कॉमेंट्री करताना कैफने मोठी प्रतिक्रिया दिली. विराट कोहलीच्या टी-२० पुनरागमनाबाबत अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. आयपीएल २०२४ नंतर टी-२० वर्ल्डकपचं आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये विराट कोहलीचा फोटो आणि नाव टूर्नामेंटचं प्रमोशन करण्यासाठी वापरलं जाईल. आयपीएलमध्ये पंजाब किंग्जविरोधात झालेल्या सामन्यात कोहलीने चमकदार कामगिरी केली. त्यानंतर विराट कोहली म्हणाला, माझं नाव जगभरात टी-२० क्रिकेट प्रमोट करण्यासाठी जोडलं गेलं आहे. पण मला वाटतंय की, मी अजूनही हा फॉर्मेट खेळू शकतो.

काँग्रेस उमेदवार कन्हैया कुमार यांना मारहाण; रोहित पवार यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

ईशान्य दिल्लीत काँग्रेस उमेदवार कन्हैया कुमार यांना मारहाण

भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीला

हरियाणात भाविकांच्या बसला भीषण आग

अमरावती महापालिका कर्मचाऱ्यांचा संप चौथ्या दिवशी स्थगित