Morcha Against Election Commission : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने उद्या सकाळी दहा वाजता गोरेगाव (पूर्व) येथील नेस्को सेंटरमध्ये मतदारयादी प्रमुखांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे मार्गदर्शन केले होते. या सभेच्यावेळी राज ठाकरेंनी दुपारी 3 वाजता शिवसेना भवनात सर्वपक्षीय विरोधकांची पत्रकार परिषदेची घोषणा केली होती. या पत्रकार परिषदेमध्ये ठाकरेगटाचे खासदार संजय राऊत, मनसेचे नेते बाळा नांदगावकर, कॉंग्रेसचे नेते सचिन सावंत, असे लोक उपस्थितीत होते. पत्रकार परिषदेमध्ये मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी भाष्य केले.
त्यावेळी ते म्हणाले की, 'या मतदार यादीत जो घोटाळा आहे, त्यावर तीव्र भावना व्यक्त झाल्याने आता लोकांना समजले आहे. आता निवडणूक आयोगाची भेट घेऊन पत्र दिले. यानंतर 2 निवडणूक अयोगला भेटल्या नंतर सर्व नेत्यानी आपल्या भूमिका मांडल्याने झालेला घोळ त्याच्या विरोधात हे आंदोलन 1 नोव्हेंबरला होणार आहे. "