माध्यमांच्या आजच्या जडणघडणीचा अविभाज्य घटक असलेल्या आणि या वर्षी विशेष प्रभावशाली ठरलेल्या कला, सामाजिक, राजकारण अशा विविध विभागांमध्ये आपला जोरदार ठसा उमटवणाऱ्या मान्यवर दिग्ग्ज व्यक्तींच्या कार्याचा गौरव 'माई मीडिया 24' प्रस्तुत 'मीडिया असोशिएशन ऑफ इंडिया'तर्फे 'मीडिया एक्सलेन्स अॅवॉर्ड 2025 ' देऊन करण्यात आला. या कार्यक्रमाचे सहकारी प्लॅनेट मराठी असून आज, मंगळवारी 3 जून रोजी हा पुरस्कार सोहळा दादरमधील, शिवाजी पार्क येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह पार पडला.
यावेळी लोकशाही मराठी वृत्तवाहिनीचे व्यवस्थापकीय संपादक विशाल पाटील यांना पत्रकारितेसाठी 'मीडिया एक्सलन्स अॅवॉर्ड 2025' देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी विशाल पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांच्या 20 वर्षांच्या पत्रकारितेच्या क्षेत्रातील अनेक उल्लेकनीय टप्प्यांची माहिती देतानाच 'पुस्तकं वाचण्यापेक्षा माणूस कसा वाचावा, हे पत्रकारिता शिकवते', हा अनुभव त्यांनी मांडला.
तसेच सयाजी शिंदे (सामाजिक कार्य - निसर्ग संवर्धन), प्रसाद गावडे (रानमाणूस - उद्योग, पर्यटन क्षेत्र योगदान), सुजाता रायकर (आरोग्य क्षेत्र - थॅलेसेमिया मुक्ती दूत), डॉ. प्रदीप ढवळ (साहित्यक्षेत्र - सांस्कृतिक योगदान), अॅड. संगिता चव्हाण (स्त्री सक्षमीकरण - सामाजिक कार्यकर्त्या), संतोष पवार (सांस्कृतिक क्षेत्र - लोककला संवर्धन), वैदेही परशुरामी (लक्षवेधी अभिनेत्री), नीतिन केळकर (पत्रकारिता, जीवनगौरव), अनन्या गोयंका (शिक्षण क्षेत्र - सामाजिक कार्य), किशोर आपटे (वरिष्ठ पत्रकार), मोहन बने (ज्येष्ठ छायाचित्रकार), श्रीकांत बोजेवार (ज्येष्ठ पत्रकार सल्लागार, महाराष्ट्र टाइम्स), संजीव भागवत (संशोधक पत्रकार, दै. सकाळ), प्रेरणा जंगम (पत्रकार, सकाळ प्रीमियर), श्वेता वडके (वृत्तनिवेदिका, न्यूज 18 लोकमत), रविराज इळवे (कामगार कल्याण कार्य - महाराष्ट्र कामगार कल्याण आयुक्त) यांना मीडिया एक्सलन्स एवाँर्ड 2025' ने सन्मानित करण्यात आले.
या पुरस्कार सोहळ्याचे समन्वयक - संस्थापिका अध्यक्षा शीतल हरीष करदेकर, कार्याध्यक्ष - सचिन चिटणीस, कपिल देशपांडे, व्यवस्थापन/तांत्रिक - चेतन काशीकर, लक्ष्मीकांत घोणसे पाटील, कलाविभाग - गणेश तळेकर, सुरज खरटमल, विजय कांबळे आहेत.