छत्रपती संभाजी नगर मधील औरंगजेबाची कबर हटवावी या मागणीसाठी आज राज्यभरात बजरंग दलाच्या वतीने आंदोलन केलं जात आहे याच पार्श्वभूमीवर नागपूरसह ठाण्यात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून औरंगजेबची कबर हटवण्याची मागणी केली आहे.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना मागणीचे पत्र देऊन घोषणाबाजी करण्यात आली. या वेळी औरंगजेबाविरोधात घोषणा देण्यात आल्या तसेच छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा जयजयकार करण्यात आला.
तसेच गळ्यामध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे रुमाल घालून हिंदुत्ववादी संघटना आंदोलनाकरता आल्या होत्या. त्याचसोबत काँग्रेसच्या काळात त्यांनी अनेक मान्य नसलेल्या ठिकाणी संरक्षण दिले. परंतु, हे सरकार हिंदुत्ववादी आहे ते योग्य निर्णय घेतील. अन्यथा येणाऱ्या काळात आम्ही आणखी तीव्र आंदोलन करू असा इशारा यावेळी विश्व हिंदू परिषदेने दिला आहे.