देशभरात गोकुळाष्टमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
विठ्ठल मंदिरात रात्री 12 वाजता कृष्ण जन्मोत्सव साजरा झाला. विठुरायाला खास पेहराव करण्यात आला आहे.
गुराख्याचे रूप दिलेल्या विठुरायाच्या हातात चांदीची काठी देऊन देवाच्या मागे मोरपिसं लावण्यात आली होती.
विठ्ठल सभामंडपात जन्माष्टमीचे कीर्तन सुरू असताना रात्री बारा वाजता पाळण्यात घालून कृष्णाचा जन्माचा आनंद साजरा करण्यात येतो.
पंढरपुरात भाविकांनी विठुरायाच्या दर्शनासाठी गर्दी केली होती.
रात्री 12 वाजता ठिकठिकाणी कृष्णजन्माचा जल्लोष पाहायला मिळाला.