आज वसंतपंचमी विठुराया आणि रुक्मिणी मातेच्या विवाह सोहळा पार पडत आहे. पंढरपूरच्या विठुरायाच्या चरणी एका भाविकाने तब्बल दोन कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने अर्पण केले आहेत. मंदिर समितीच्या इतिहासामध्ये सर्वात मोठे दान असल्याचे मानले जाते.
पंढरपूरच्या विठुरायाच्या चरणी एका भाविकाने तब्बल दोन कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने अर्पण केले आहेत. या दानामध्ये विठ्ठल आणि रुक्मिणीला सोन्याचे मुकुट, विठ्ठल आणि रुक्मिणी मातेला मोहोन माळ, रुक्मिणी मातेला कोल्हापुरी साज, पाटल्या, बांगड्या, मंगळसूत्र, जोडवी असे सोन्याचे दागिने दिले आहेत. याशिवाय देवाच्या नित्योपचारासाठी चांदीचे मोठे ताट, वाटी, समई, तांब्या, भांडी, ताम्हण, पळी आणि देवाचा चांदीचा आरसा असे आहे.
मंदिर समितीच्या इतिहासामध्ये सर्वात मोठे दान असल्याचे मानले जाते.विठ्ठल मंदिरात आज दुपारी बारा वाजता विठ्ठल आणि रुक्मिणीचा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न होणार आहे. या निमित्त पंढरपुरात जय्यत तयारी सुरु आहे.बंगळूरू इथल्या एका भाविकाने विठ्ठल रुक्मिणी यांच्या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने पोषाख भेट दिला आहे.