ताज्या बातम्या

BMC Election : मुंबई महापालिकेच्या 227 जागांसाठी आज मतदान; कडेकोट पोलिस बंदोबस्त

मुंबई महानगरपालिकेच्या 227 जागांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत असून, सकाळी 7.30 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे.

Published by : Varsha Bhasmare

मुंबई महानगरपालिकेच्या 227 जागांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत असून, सकाळी 7.30 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. ही प्रक्रिया सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत चालणार आहे. देशातील सर्वात श्रीमंत आणि महत्वाची मानली जाणारी ही महानगरपालिका असल्याने, या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचेच नव्हे तर देशाचे लक्ष लागले आहे.

मुंबईत मतदान प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत पार पडावी यासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. तब्बल 25 हजारांहून अधिक पोलीस कर्मचारी या निवडणूक प्रक्रियेसाठी तैनात आहेत. यामध्ये 10 अतिरिक्त पोलीस आयुक्त, 33 डीसीपी, 84 एसीपी यांच्यासह होमगार्ड्स, एसआरपीएफ आणि क्विक रिस्पॉन्स टीम्सचा समावेश आहे. संवेदनशील आणि अतिसंवेदनशील मतदान केंद्रांवर विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला असून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारेही नजर ठेवली जात आहे.

या निवडणुकीत राजकीय समीकरणे अत्यंत चुरशीची असल्याचे चित्र आहे. सत्ताधारी महायुती आणि विरोधकांमध्ये थेट लढत पाहायला मिळत आहे. भाजप 137 जागांवर तर शिवसेना शिंदे गट 90 जागांवर निवडणूक लढवत आहे. महायुतीकडून मुंबईवर सत्ता मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने 94 जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. शिवसेना ठाकरे गट सर्वाधिक म्हणजे 163 जागांवर निवडणूक लढवत असून, मनसेने 52 जागांवर उमेदवार दिले आहेत. त्यामुळे मुंबईतील मराठी मतदारांचा कौल कुणाच्या बाजूने जाणार, याकडे विशेष लक्ष लागले आहे.

काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी ही निवडणूक एकत्रितपणे लढवत आहेत. काँग्रेसने 143 जागांवर तर वंचित बहुजन आघाडीने 46 जागांवर उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळे बहुकोनी लढत होण्याची शक्यता असून, प्रत्येक वॉर्डातील निकाल अनिश्चित मानले जात आहेत. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेपुरती मर्यादित नसून, आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांची नांदी मानली जाते. त्यामुळे आजचा मतदारांचा कौल हा राज्याच्या राजकारणाची दिशा ठरवणारा ठरणार आहे. मतदानानंतर उद्या होणाऱ्या मतमोजणीतून मुंबईच्या सत्तेचा फैसला होणार आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा