थोडक्यात
बिहारमध्ये निवडणूक प्रचाराची सांगता
अखेरच्या टप्प्यात 122 जागांसाठी उद्या मतदान
शुक्रवारी मतमोजणी होणार
(Bihar Election ) बिहारमध्ये प्रचाराच्या तोफा थंडावल्या असून उद्या 122 जागासांठी मतदान होणार आहे. 11 नोव्हेंबर रोजी दुसऱ्या टप्प्यात 122 विधानसभा मतदारसंघांसाठी मतदान होणार असून, 14 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.
6 नोव्हेंबर रोजी पहिल्या टप्प्यासाठी मतदार पार पडलं आणि 65 टक्के मतदानाची नोंद झाल्याची माहिती मिळत आहे. मतदानासाठी एकूण 45,399 बूथ उभारण्यात आल्याची माहिती मिळत असून या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, राजनाथ सिंह, जेपी नड्डा, नितीश कुमार, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी, दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या सभा होऊन जोरदार प्रचार करण्यात आला.
यासोबतच दुसरीकडे पाहायला गेले तर राहुल गांधी, प्रियांका गांधी, तेजस्वी यादव, मल्लिकार्जुन खरगे आणि अखिलेश यादव यांच्यासह अनेक नेत्यांनी देखील जोरदार प्रचार अनेक सभा घेतल्या. यामुळे आता या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले असून कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.