ताज्या बातम्या

Voting Time : मतदानाच्या वेळेत बदल; 6 ऐवजी आता 'इतक्या' वाजेपर्यंत होणार मतदान

नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या मतदानासाठी (Maharashtra Election) निवडणूक आयोगाची राज्यातील यंत्रणा सज्ज झाली आहे. एकूण 1 कोटी 7 लाख 3 हजार 576 मतदार मतदानाचा नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी हक्क बजावणार आहेत.

Published by : Riddhi Vanne

नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या मतदानासाठी (Maharashtra Election) निवडणूक आयोगाची राज्यातील यंत्रणा सज्ज झाली आहे. एकूण 1 कोटी 7 लाख 3 हजार 576 मतदार मतदानाचा नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी हक्क बजावणार आहेत. निवडणूक आयोगाने त्यासाठी सुमारे 13 हजार 355 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती दिली. ईव्हीएम मशीनचा व्यवस्था या निवडणुकांसाठीकरण्यात आली असून त्यात 13 हजार 726 कंट्रोल युनिट आणि 27 हजार 452 बॅलेट युनिटची उपलब्धता करण्यात आली आहे.

राज्यातील 246 नगरपरिषदा तर 42 नगरपंचायतींच्या (एकूण 288) सदस्यपदासाठी आणि थेट अध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता 2 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. 2 डिसेंबरला सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत मतदानाची वेळ असणार आहे. तर मतमोजणी 3 डिसेंबरला सकाळी 10 वाजेपासून सुरु होणार आहे.

दुबार नावांसमोर डबल स्टार चिन्ह

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदार यादीतील संभाव्य दुबार मतदाराच्या नावासमोर (**) असे डबल स्टार चिन्ह नमूद करण्यात येणार आहे. त्यामुळे ज्याच्या नावासमोर ते चिन्ह आहे त्याने कुठे मतदान करणार आहोत याची माहिती देणं आवश्यक आहे. अशा मतदाराने एका ठिकाणी मतदानाचा हक्क बजावला तर दुसऱ्या ठिकाणी तशी माहिती देण्यात येणार आहे. त्यामुळे दोन ठिकाणी त्याला मतदान करता येणार नाही याची खबरदारी निवडणूक आयोगाने यावेळी घेतल्याचं दिसून येतंय.

नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या या निवडणुकांसाठी 288 निवडणूक निर्णय अधिकारी आणि 288 सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर 66 हजार 775 इतके अधिकारी आणि कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

एकूण मतदार व मतदान केंद्र

पुरुष मतदार- 53,79,931

महिला मतदार- 53,22,870

इतर मतदार- 775

एकूण मतदार- 1,07,03,576

एकूण मतदान केंद्र- सुमारे 13,355

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा