ताज्या बातम्या

Vidhan Parishad Election : विधानपरिषदेच्या 10 जागांसाठी आज मतदान, कोण मारणार बाजी?

विधान परिषदेच्या एकूण 10 जागांसाठी सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. त्यानंतर मतमोजणी संध्याकाळी 5 वाजता सुरू होणार आहे. त्यामुळे भाजप की कॉंग्रेसमध्ये कोण मारणार बाजी हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Published by : Shweta Chavan-Zagade

विधान परिषदेच्या 10 जागांसाठी आज ( 20 जून ) मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. 11 उमेदवार रिंगणात असून गुप्त मतदान प्रक्रिया असल्याने ही निवडणूक अटीतटीची होणार आहे. विधान परिषदेच्या एकूण 10 जागांसाठी सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. त्यानंतर मतमोजणी संध्याकाळी 5 वाजता सुरू होणार आहे. त्यामुळे भाजप की कॉंग्रेसमध्ये कोण मारणार बाजी हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

एकूण ११ उमेदवार रिंगणात

भाजपाचे प्रविण दरेकर, श्रीकांत भारतीय, उमा खापरे, राम शिंदे, प्रसाद लाड हे उमेदवार रिंगणात आहेत. शिवसेनेचे सचिन अहिर, आमशा पाडवी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे रामराजे नाईक निंबाळकर आणि एकनाथ खडसे कॉंग्रेसचे चंद्रकांत हंडोरे आणि भाई जगताप यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. प्रत्येक उमेदवाराला निवडून येण्यासाठी २६ मतांची गरज आहे. कॉंग्रेसचा दुसरा उमेदवार भाई जगताप (Bhai Jagtap) आणि भाजपाचा पाचवा उमेदवार प्रसाद लाड ( Prasad Lad ) निवडून कसे येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे ( Eknath Khadse ) यांना पाडण्यासाठी भाजपाने जोर लावला आहे.

विधानपरिषदेची निवडणूक अवघ्या तासांवर येऊन ठेपली आहे. सकाळी ९ वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात होईल. सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय आमदारांचे दोन दिवस हॉटेल पॉलिटिक्स रंगले. नुकत्याच झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सहावी जागा जिंकून चमत्कार घडवला. विधानपरिषदेत याची पुनरावृत्ती करण्यासाठी भाजपाने कंबर कसली आहे.

राज्यसभा निवडणुकीप्रमाणे महाविकास आघाडीला दगाफटका होऊ नये यासाठी सर्वपक्षीय आमदार डोळ्यांत तेल घालून आहेत. तर पंकजा मुंडे यांना भाजपाने उमेदवारी नाकारल्याने मुंडे समर्थक आमदार नाराज आहेत. त्यामुळे मुंडे आणि खडसे समर्थकांच्या मत विभागणीची भाजपाला धास्ती आहे. राज्यसभेत अपक्ष आणि छोटे पक्षांची मते निर्णायक ठरली. आताही ही मते आपल्याकडे खेचण्यासाठी रस्सीखेच सुरू आहे. मात्र ही निवडणूक गुप्त मतदान प्रक्रियेद्वारे होणार असल्याने सर्वच पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

महाविकास आघाडीला धक्का द्यायची रणनीती?

राज्यसभेच्या निवडणुकीनंतर आता भाजपने याही निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला धक्का द्यायची रणनीती आखली आहे. दहाव्या जागेसाठी काँग्रेसचे भाई जगताप आणि भाजपचे प्रसाद लाड यांच्यात लढत होणार आहे. त्यामुळे विधानपरिषदेची खरी लढत ही काँग्रेस आणि भाजपमध्येच असल्याचं दिसून येत आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : विजयी मेळाव्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते मुंबईत दाखल

Satara School : 'या' तालुक्यातील 334 शाळांना पावसाळी सुट्टी जाहीर

Raj Thackeray - Uddhav Thackeray : विजयी मेळाव्यात 'या' नेत्यांचीही होणार भाषणं; तर उद्धव ठाकरेंच्या भाषणाचे होईल समारोप

Saamana Editorial : '...ते अर्थात ‘ठाकरे भाऊ' विजयी मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर सामनातून नेमकं काय म्हटलंय?