बीड जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया देखील येत आहेत. अनेक ठिकाणी या प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटताना पाहायला मिळत आहेत.
याच पार्श्वभूमीवर आता वाल्मिक कराडविषयी नवीन माहिती समोर येत आहे. वाल्मिक कराडने तब्बल 6 वेळा आवादा कंपनीकडे खंडणी मागितल्याची माहिती मिळत आहे. या खंडणी प्रकरणाची सुनावणी उद्या 12 मार्च रोजी केज न्यायालयात होणार आहे.