थोडक्यात
वाल्मिक कराड तीन आठवड्यांपासून फरार
पुण्यात सीआयडीसमोर शरण
वाल्मिक कराडला 14 दिवसांची सीआयडी कोठडी
बीड जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया देखील येत आहेत. अनेक ठिकाणी या प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटताना पाहायला मिळत आहेत.
या पार्श्वभूमीवर वाल्मिक कराड पुण्यात सीआयडीसमोर शरण आला. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराड तीन आठवड्यांपासून फरार होता. या प्रकरणात आतापर्यंत चार आरोपीला अटक करण्यात आली असून तीन आरोपी फरार आहेत.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संलग्न असलेल्या खंडणी प्रकरणात वाल्मिक कराड यांच्यावर गुन्हा दाखल असल्याने त्याला केज न्यायालयात हजर करण्यात आले. केज कोर्टानं वाल्मिक कराडला 14 दिवसांची सीआयडी कस्टडी देण्याचा निर्णय घेतला आहे.