वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेनंतर आता राज्यसभेतही मंजूर करण्यात आला आहे. वक्फ सुधारणा विधेयक राज्यसभेत मंजूर करण्यात आले असून राज्यसभेत या विधेयकाच्या बाजूने 128 तर विरोधात 95 मते मिळाली.
वक्फ सुधारणा विधेयकावर 12तासांहून अधिक काळ चर्चेनंतर बुधवारी उशिरा लोकसभेत 288विरुद्ध 232मतांनी संमत करण्यात आले असून यानंतर राज्यसभेतही काल रात्री उशिरापर्यंत इंडिया आघाडीकडून जोरदार विरोध करण्यात आला.
12 तासांच्या चर्चेनंतर गुरुवारी रात्री 2.33 वाजता राज्यसभेत मंजूर करण्यात आले. वक्फ दुरुस्ती विधेयक बुधवारी लोकसभेत 12 तासांच्या चर्चेनंतर मंजूर करण्यात आले. पहाटे 2 वाजता झालेल्या मतदानात 520 खासदारांनी भाग घेतला. 288 जणांनी बाजूने तर 232 जणांनी विरोधात मतदान केले. हे विधेयक राष्ट्रपतींकडे मंजुरीसाठी पाठवले जाणार असून राष्ट्रपतींनी अधिसूचना जारी केल्यावर हा नवा कायदा लागू होईल.