Wardha Team Lokshahi
ताज्या बातम्या

कृषी विचारांकडे नागरिकांची पाठ, तर विद्रोही विचाराला नागरिक हाऊसफुल्ल गर्दी

अखिल भारतीय विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष चंद्रकांत वानखेडे यांनी केंद्र सरकारवर ताशेरे ओढले.

Published by : Sagar Pradhan

भूपेश बारंगे|वर्धा : महात्मा गांधी व विनोबा भावेच्या पावन भूमीवर वेगवेगळ्या विचारांचे दोन साहित्य संमेलन घेण्यात आले आहेत. राष्ट्रपिता महात्मा गांधी साहित्य नगरीत 96 व्या अखिल भारतील मराठी संमेलन सुरू आहेत तर दुसरीकडे सर्कसपूर मैदानात 17 वे अखिल भारतीय मराठी विद्रोही साहित्य संमेलन आजपासून सुरू झाले आहे. पांढरपेशा संमेलनाला मात्र नागरिकांनी हुलकावणी देत विद्रोही विचारांच सोनं लुटण्यासाठी नागरिकांनी हाऊसफुल्ल गर्दी केलेली पाहायला मिळाली.

आचार्य विनोबा भावे सभा मंडपात दुपारच्या सुमारास कृषिजीवनातील अस्थिरता,प्रक्षोभ आणि मराठी लेखकांचे विचार मांडत असताना सभा मंडपात मात्र बोटावर मोजण्याइतके नागरिक उपस्थित होते.भारत देश हा कृषिप्रधान देश म्हटलं जातं. मात्र,यावेळी कृषी जीवनातील अस्थिरताचे विचार ऐकण्यासाठी शेतकरी व नागरिकांनी याकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले. हजारो शेतकरी नागरिक बसणार अशी व्यवस्था केली असून सुद्धा नागरिकानी या संमेलनाला पाठ दाखवल्याने आयोजकांच्या कार्यप्रणालीवर प्रश्न निर्माण होताना दिसत आहे. त्याच भूमीवर मात्र विद्रोही विचार ऐकण्यासाठी नागरिकांची हाऊसफुल्ल गर्दी केलेली दिसून आली.

अखिल भारतीय विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष चंद्रकांत वानखेडे यांनी केंद्र सरकारवर ताशेरे ओढले.अन्यायाच्या विरोधात उभ राहणं यालाच विद्रोह म्हणतात. असही ते यावेळी बोलले. इथं तर खोक्याच चालू आहे. गर्दी दोन कोटी भेटले म्हणून येत असते का? पन्नास लाखात होत नाही म्हणून दोन कोटी.त्याच्यात भागात नाही. तर शिक्षकांच्या याच्यामधून हजारांच्या पावत्या,आणि कालच्या मिरवणुकीत गंमत एवढी तुफान गर्दी होती. सगळे जिल्हा परिषद शाळेचे पोर बिचारे मिरवणुकीत होते,कोणी मोठे माणस नव्हते. शिक्षक तुमचे गुलाम विद्यार्थी तुमचे गुलाम भीती एवढी बोलत नाही.कुचाट आहे.असे बोलून विरोधी साहित्य संमेलनाध्यक्ष चंद्रकांत वानखेडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी साहित्य नगरीतील संमेलनावर टीकास्त्र केले. 96व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात मात्र सायंकाळी गर्दी बघायला मिळाली.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा