भूपेश बारंगे, वर्धा |
जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गवरून कंटेनरने सुगंधित तंबाखू ,गुटखा अवैधरित्या जात असल्याची पेट्रोलिंग दरम्यान माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळताच सिंदी परिसरात सापळा रचून दिल्लीवरुन मुंबईकडे जाणाऱ्या कंटेंनरला थांबवण्यात आले. यावेळी अन्न सुरक्षा अधिकारी सोबत घेऊन स्थानिक गुन्हे शाखेच्या कंटेनर चालक यांना विचारपूस केली असता दीपक ट्रान्सपोर्टचे मालक व विकास छाबडा रा.दिल्ली या दोघांचा असल्याचे सांगितले. कंटेनर क्र. आर जे 52 जीए 5670 मधून दिल्ली येथून मुंबईला प्रतिबंधित सुगंधित तंबाखू घेवून जात असल्याचे सांगण्यात आले.
कंटेनर ताब्यात घेऊन पाहणी दरम्यान वेगवेगळ्या कंपनी 70 लाख सहा हजार पाचशे रुपयांचा प्रतिबंधित तंबाखू आढळून आला.वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला कंटेनर किंमत 30 लाख असून एकूण एक कोटी सहा हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. कंटेनरमध्ये सुपर कॅश गोल्ड कंपनीचा सुगंधित तंबाखु वनज ५१०३ कि.ग्रॅ., सिग्नेचर कंपनीचा सुगंधित पान मसाला वजन ११०१ कि.ग्रॅ. , व्ही.सी. ५ कंपनिचा सुगंधित तंबाखु वजन ८५० कि.ग्रॅ. असा प्रतिबंधीत सुगंधित तंबाखु किंमत 70 लाख सहा हजार पाचशे तसेच वाहतुकीसाठी वापनण्यात आलेले कंटेनर किमंत तीस लाख असा एकुण मुद्देमाल एक कोटी सहा हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल मिळुन आल्याने सदरचा माल गुन्हयाचे पुराव्याकामी ताब्यात घेतला.
आरोपी शाहीद ईलीयास, वय ३२ वर्षे, रा. मु.पो. अडवर, ता.जि. नुह (मेवात), रा. हरियाणा , हाकमखॉन शाकिरखॉन वय २२ वर्षे, रा. मु.पो. अडवर, ता.जि. नुह (मेवात), रा. हरियाणा ,दिपक ट्रान्सपोर्ट चे मालक , विकास छाबडा दोन्ही रा. दिल्ली , वाहन मालक अशिना विकास छाबडा रा. दिल्ली यांचे विरूध्द पोलीस स्टेशन सिंदी (रेल्वे) येथे कलम १२३, २७४, २७५, २२३, भा.न्या.सं. सह कलम २६(१), २६(२) (iv), २७ (३) (९), ३०(२) (a), ३(१) (zz) (iv), ५९ अंन्नसुरक्षा व मानके कायदया अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
सदरची कारवाई अनुराग जैन, पोलीस अधीक्षक वर्धा, डॉ. सागर कवडे, अपर पोलीस अधिक्षक, यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, पोउपनि अमोल लगड, राहुल ईटेकार, बालाजी लालपालवाले व पोलीस अंमलदार नरेन्द्र पाराशर, मनिष श्रीवास, गजानन लामसे, चंद्रकांत बुरंगे, भुषण निघोट, रितेश शर्मा, मनिष कांबळे, अमोल नगराळे, नितीन ईटकरे, गोपाल बावणकर, सागर भोसले, मंगेश आदे, दिपक साठे, मिथुन जिचकार, प्रफुल पुनवटकर, सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा यांनी केली.