ताज्या बातम्या

कारंज्यात क्रिकेट जुगार अड्ड्यावर धाड, 10 जणांवर गुन्हा दाखल

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ; भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यातील खेळावर, लाखाचा मुद्देमाल जप्त

Published by : Siddhi Naringrekar

भूपेश बारंगे,वर्धा

कारंजा शहरात क्रिकेट जुगार अड्ड्यावर धाड टाकून 10 जणांवर गुन्हा दाखल केला असून एका जणाला अटक करण्यात आली आहे.ही कारवाई शहरातील प्रभाग क्र.16 मधील काँग्रेस पक्षाच्या नेतेच्या घरी सायंकाळी करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.याप्रकरणी आज पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या माहितीनुसार अभिजित पेटकर नावाचा इसम हा भारत विरुद्ध न्यूझीलंड क्रिकेट 20-20 सामन्यावर लोकांकडून त्याच्याजवळ असलेल्या मोबाईलद्वारे बोलून हारजीतवर, विकेटवर,धावावर बोली लावून पैश्याची हारजीत लगवाडी असा क्रिकेट सामन्यावर जुगार खेळ त्याच्या घर चालवत आहे.यावरून आरोपी अभिजित पेटकर हा अहमदाबाद क्रिकेट स्टेडियम मध्ये भारत विरुद्ध न्यूझीलंड या दोन्ही संघाच्या सामन्यावर आठ आरोपी क्रिकेट जुगार मोबाईलवर खेळत असल्याचे निष्पन्न झाले.यात मुख्य बुकी संजय उदापुरकर रा.परतवाडा यांच्यासह योगेश इंगोले,धरमसिंग बावरी, माही विजय पिपला, रितू परवानी ,निकेश चावके, रिंकेश तेलहानी, राहुल भांगे, मिथुन बावरी यांच्यावर गुन्हा दाखल केला असून अभिजित अरुण पेटकर याला अटक करण्यात आली आहेत.

अभिजित पेटकर यांच्याकडून लॅपटॉप, मास्टर मशीन फोन रिसिव्हर, रेकॉर्डर, एक्स्टन्शन बॉक्स, हेडफोन, विविध कंपनीचे मोबाईल,काळ्या रंगाचे 11 मोबाईल यासह नगद रोकड जप्त करण्यात आली.यामध्ये एक लाख 36 हजार 330 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे ,पोलीस निरीक्षक संजय गायकवाड, पोलीस निरीक्षक दारासिंग राजपूत ,उपनिरीक्षक अमोल लगड, हमीद शेख, चंद्रकांत बुरंगे ,श्रीकांत खडसे, मनीष कांबळे,निरंजन वरभे, रणजित काकडे,अनुप कावळे यांनी केली असून पुढील तपास सुरू आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : राज्यात आज ॲलोपॅथी डॉक्टरांचा संप

Pune : पुण्यात कोथरूडमध्ये मध्यरात्री गोळीबार; एकजण गंभीर जखमी

Latest Marathi News Update live : मीनाताई ठाकरे पुतळ्यावर रंग टाकल्याप्रकरणी आरोपी अटकेत

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींनी घाईघाईने निर्णय घेऊ नका, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य