ताज्या बातम्या

सासुरवाडीच्या शेतीचा वाद विकोपाला गेला अन दारूत विष कालवून साडभावाचा गेम खल्लास केला

वर्ध्यात सासुरवाडीच्या पाच एकर शेतीच्या हिस्सेवाटणीच्या कारणातून झालेल्या वादात दारुत विषप्रयोग करुन भावाची निष्ठूर हत्या केल्याची घटना सेलू तालुक्यातील जुनगड येथील पिंपळेमठ परिसरात घडली

Published by : Siddhi Naringrekar

भूपेश बारंगे, वर्धा

वर्ध्यात सासुरवाडीच्या पाच एकर शेतीच्या हिस्सेवाटणीच्या कारणातून झालेल्या वादात दारुत विषप्रयोग करुन साडभावाची निष्ठूर हत्या केल्याची घटना सेलू तालुक्यातील जुनगड येथील पिंपळेमठ परिसरात घडली.या हत्याप्रकरणात पोलिसांनी सुरवातीला अकस्मात मृत्यूची नोंद केली मात्र तपासात ही हत्या असल्याच उलगडा झाल्याने हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. प्रकरणी मृतकाचा साडभाव असलेल्या मुख्य आरोपीसह विष आणणाऱ्या दोघांना सेलू पोलिसांनी अटक केली. मोरेश्वर मारोतराव पिंपळे ३४ रा. जुनगड असे मृतकाचे नाव आहे. अटक केलेल्यात मुख्य आरोपी संदीप रामदेव पिंपळे याच्यासह विष आणून देणाऱ्या विजयसिंह चितोडीया , राजकुमार चितोडीया दोन्ही रा. सावरखेड जि. अमरावती यांचा समावेश आहे.

मृतक मोरेश्वर याने १८ ऑगस्टच्या रात्रीच्या सुमारास स्वतःच्या घरातच दारुचा घाेट रिचवला. मात्र, काही मिनिटांतच तो जमिनीवर कोसळला, दातखिळ बसली. घरातील सदस्यांनी मोरेश्वरला सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. याप्रकरणी सेलू पोलिसांनी १९ रोजी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली होती. सेलूचे पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी जात पंचनामा केला असता संशय बळावला. तेथे दारुची बाटली पडलेली होती. बाटलीतून उग्र वास आणि झाकणावरील बारीक छिद्रांमुळे घातपात झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ तपासचक्र फिरवून तपासाला सुरवात केलीय. दरम्यान मुख्य आरोपी असलेला साडभाऊ संदीप पिंपळे याला विचारपूस करत पोलिसी हिसका दाखवताच त्याने हत्या केल्याचे कबूल केले.आरोपीने सासऱ्याच्या असलेल्या तपाच एकर सामाईक शेतीच्या हिस्सेवाटणी दरम्यान झालेल्या वादाचा राग असल्याने त्याने दारुत विषप्रयोग करुन मोरेश्वरला ठार मारल्याची कबूली पोलिसांना दिली.

आरोपी संदीप पिंपळे याने सिनेमातील क्राईम कथानकाला लाजवेल असा खूनाचा कट रचला होता. सहा महिन्यापासून तो हत्येच्या प्रयत्नात होता.आरोपीने दारुची बाटली विकत घेऊन ती मृतक मोरेश्वर याच्या घरासमोर फेकून दिली आणी त्याला दारू बाहेर ठेवली असल्याच सांगितलं. त्यानंतर माेरेश्वरने जेवण केले आणि रात्रीच्या सुमारास दारुचा घोट रिचवला. मात्र, तो दारुचा घोट त्याचाच काळ ठरला. आरोपी संदीप हा शिक्षणात कमी आहे. मात्र, त्याने ठंड डोक्याने केलेल्या निष्ठूर हत्येने पोलिसही आवाक राहिले हे मात्र तितकेच खरे. मोरेश्वरचा मृत्यू झाल्यावरही आरोपी संदीप हा त्याच्या नातलगांना भेटण्यासाठी गेला. स्मशानात अंत्यसंस्काराला देखील गेला. मुख्य आरोपीला अटक केल्यावर त्याने विष हे जडीबुटी विकणाऱ्याकडून आणल्याचे सांगितले. यावरून पोलिसांनी विजयसिंह चितोडीया आणि राजकुमार चितोडीया या दोघांना अटक केलीय. दोघे जडीबुटी विक्रीचा व्यवसाय आहे. संदीप पिंपळे याच्या कुटुंबियातील सदस्यांची प्रकृती खराब राहत असल्याने त्याने यापूर्वी यांच्याकडून काही औषधी घेतल्या होत्या. तेव्हापासूनच संदीप यांच्या संपर्कात होता. यातून त्यांची ओळख वाढली आणि मोरेश्वरला मारण्याच कटात यांनी विष उपलब्ध करून देत मदत केलीय. या घटनेत कोणत्या प्रकारचे विष वापरण्यात आले याची माहिती घेण्यासाठी पोलिसांनी घटनास्थळी जप्त केलेली बॉटल प्रयोगशाळेत पाठविण्यात आली आहे.

सासरवाडीच्या पाच एकर शेतजमिनीवर डोळा

सासुरवाडीला पाच एकर जमीन असताना दोन साडभावाच्या हिस्से वाटणीत वाद झाला.त्यात बायकोच्या बहिणीच्या नवऱ्याच्या दारूत विष कालवून त्याला जीवाशी ठार केलं. शेतीसाठी एकमेकांचे जीव घेण्यापर्यंत आता नातेवाईक तुटून पडत असताना दिसत आहे.अनेक घटनेत भावा भावाची हत्या झाल्याच्या घटना उघडकीस येत असतात.त्यात वर्ध्यातील सेलू तालुक्यात चक्क सासुरवाडीच्या शेतजमीनीवर डोळा ठेवून साडभावाचा गेम केला.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Anjali Damania On Dhananjay Munde : 'ती' फाईल गायब केली' दमानियांचा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल

Devendra Fadnavis Called Sharad pawar And Uddhav Thackeray : "आम्हाला तुमच्याही पाठिंब्याची गरज" फडणवीसांची थेट पवार आणि ठाकरेंना फोनवर विनंती; राजकीय वर्तुळात भूकंप

Share Market News : रशिया-युक्रेन युद्ध संपण्याच्या शक्यतेने गुंतवणूकदारांना दिलासा; सेंसेक्स आणि निफ्टीत वाढ

Himachal Monsoon : हिमाचल प्रदेशात पावसाचा कहर! आत्तापर्यंत 276 नागरिकांचा मृत्यू