ताज्या बातम्या

वर्ध्यात जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याने विश्रामगृहाला बनविले लाचखोरीचा अड्डा

वीस हजारांची लाच स्वीकारताना जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यासह एकास अटक; खोलीत आढळले पाच लाख 60 हजाराची रोकड

Published by : Sagar Pradhan

भूपेश बारंगे|वर्धा: जिल्हा पुरवठा अधिकारी यांला गुरुवारी रात्री वर्धेच्या शासकीय विश्रामगृहात स्वस्त धान्य व्यावसायिकाकडून वीस हजाराची लाच स्विकारल्याप्रकरणी जिल्हा पुरवठा अधिकारी विजय कृष्ण सहारे याला नागपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे.

वर्ध्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी शासकीय विश्रामगृहात एका खोलीत मुक्कामानी राहायचे.याच दरम्यान संपूर्ण जिल्ह्यातील स्वस्त धान्य व्यावसायिकाकडून महिन्याकाठी लाखोंची माया गोळा करायचा.

देवळी येथील स्वस्त धान्य दुकानदाराकडे दोन स्वस्त धान्य दुकानातील नियमित हप्ता देण्याचा तगादा जिल्हा पुरवठा अधिकारी विजय कृष्ण सहारे यांनी लावला होता. सात महिन्याच्या कमिशेन 25 हजार रुपयांची मागणी करण्यात आली.तर पंतप्रधान गरीब कल्याण योजने अंतर्गत स्वस्त धान्य दुकानदाराना मिळणाऱ्या कायदेशीर कमिशन मधून पैश्याची मागणी केली.दरम्यान तडजोडी अंती स्वस्त धान्य दुकानदाराने 40 हजार रुपये देण्यास सहमती दिली.त्यानंतर रात्री वर्ध्याच्या शासकीय विश्रामगृहात पहिला हप्ता 20 हजार रुपयांची रक्कम देत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडले. विजय सहारे याच्या सोबत असलेला खासगी सहकारी ऋषिकेश ढोडरे याला ताब्यात घेण्यात आले.

यावेळी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या खोलीची पाहणी केली असता वेगवेळ्या लिफाफ्यात पाच लाख 60 हजार 360 रुपये मिळून आले.यावरून जिल्हा पुरवठा अधिकारी मद्यस्थिच्या माध्यमातून याठिकाणी लाचखोरी उकळण्याचा धंदा उघडल्याचे दिसून आले.रात्रीला लाखोंची माया गुंडाळणाऱ्या पुरवठा अधिकाऱ्याला मात्र अखेर लाचखोरीत अटक व्हावे लागले. ही कारवाई लाचलुचपत विभागाचे नागपूर परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक राहुल माकणीकर,मधुकर गीते, पोलीस उपअधीक्षक श्रीमती अनामिका मिरझापुरे,पोलीस निरीक्षक प्रवीण लाकडे, सारंग बालपांडे, गीता चौधरी, अस्मिता मेश्राम, आशु श्रीरामे, करुणा सहारे, विकास गंडेवार यांनी केली.

बापरे..पुरवठा अधिकाऱ्यांच्या खोलीत पाच लाख 60 हजाराची रोकड आढळली!

विजय सहारे हे वर्धा जिल्हा पुरवठा अधिकारी रुजू झाल्यापासून ते विश्रामगृहातील रूम मध्ये राहत असायचे.गुरुवारी लाचलुचपत विभागाने रूममध्ये धाड टाकली यावेळी 20 हजार लाच स्वीकारली.त्यानंतर रूमची तपासणी दरम्यान त्याठिकाणी पाच लाख 60 हजार 360 रुपये वेगवेगळ्या पॉकेट मध्ये आढळून आले. एकाच दिवशी एवढी रक्कम या ठिकाणी स्वस्त धान्य दुकानदारांनी दिली तर नाही ना असा प्रश्न उपस्थित होत आहे.स्वस्त धान्य व्यावसायिकांकडून एवढी रक्कम उकळली जात असेल तर यात भ्रष्टाचार केला जात तर नाही ना? एवढी रक्कम देणारा कोण? रक्कम देणाऱ्यांची चौकशी केली जाणार की या प्रकरणावर पडदा पडणार?

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Gold Rate : सोन्याच्या दरात 27% वाढ ; गुंतवणूकदारांना लाभ, मात्र ग्राहकांच्या खिशाला कात्री

Ganpatipule Temple : गणपतीपुळे मंदिरात ड्रेसकोड लागू होणार

Axiom Mission 4 मोहिमेच्या यशस्वी प्रयोगानंतर शुभांशु शुक्ला 14 जुलैला परतणार

Mumbai Airport : मुंबई विमानतळावर 33 किलो हायड्रो गांजा जप्त, आठ जण अटकेत