Vaibhav Mangle Viral Facebook Post : पहिली ते पाचवीपर्यंत हिंदी ही तृतीय भाषा म्हणून अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाविरोधात राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता अभिनेते वैभव मांगलेनी एक खळजनक पोस्ट शेअर केली आहे.
पोस्टमध्ये वैभव मांगले म्हणतात की, "उर्वरीत महाराष्ट्रच मला माहीत नाही . पण मुंबईत मराठी माणसाच्या मराठीची वाट लागलेली आहे .. कामाच्या ठिकाणी सतत हिंदी किंवा इंग्रजी बोलाव लागत हा एक भाग. दुसरं म्हणजे आपल्या आपल्यात सुद्धा त्यांना मराठी बोलायची लाज वाटते. आप ली मुलं चांगल मराठी बोलायचं विसरून गेली आहेत. त्यात हिंदीची सक्ती केली तर संपलच सगळं मातृभाषेची ( मुळात आई मराठी बोलत असले तर ) भिकारणीची अवस्था होईल. आता तर खेडो पाडी इंग्रजी शाळा झाल्या आहेत . मुंबई पुणे येथे अनेक शाळामध्ये मराठी शिकवीत नाहीत . मुलांशी घरात इंग्रजी बोला सांगतात. आई बाबाला धड इंग्रजी येत नाही .. शाळेत शिक्षकांचं जे ऐकतील ते ( शिक्षक तरी किती चांगलं बोलतील ) त्यामुळे धड इंग्रजी नाही धड मराठी नाही .. त्यात बोली भाषा वेगवेगळ्या , पुन्हा शाळेत प्रमाण भाषा शिका . त्याचा वेगळा ताप . आई खिमट म्हणते आणि शाळेत मऊभात म्हणा म्हणतात.. मी उबारलायस म्हणतो शाळेत उभा राहिला आहेस म्हणतात. “माझ्या वांगडा चल “म्हणतो तर शाळेत माझ्याबरोबर चल म्हणा म्हणतात."
पुढे वैभव मांगले म्हणतात की, "ही त्या बालमनाला संकट वाटतात. तर अजून हिंदी (राष्ट्रभाषा म्हणतात तिला )जोडीला आणून बसवली तर आईची भाषा घरा बाहेर गेलीच समजा. आपण आपल्या भाषेची कमालीची भीषण अवस्था केली आहे. तिच्या बद्दल कमालीचा अनादर आहे. आम्हाला तर सिरियल ला स्क्रिप्ट सुद्धा मराठीत देत नाहीत ( अनेक ठिकाणी ) तर इतर ठिकाणी जिथे हिंदी भाषिक इंग्रजाळलेले लोक आपली काय पत्रास ठेवतात ते आपण पाहतो आहोत .हिंदी पहिली पासून येईल न येईल हा माझ्या साठीच नंतरचा मुद्दा आहे .. येणार ही नाही कदाचित पण म्हणून आपलं मराठी भाषेबद्दलच प्रेम वाढणार आहे का ?? आपण आपल्या मुलांच मराठी चांगलं होण्यासाठी अधिक सजग होणार आहोत का ?. मुळात आपण मराठीत बोलणार आहोत का ????"