Sanjay Raut On Goverment : "...मेहरबानी म्हणावी लागेल” संजय राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल  Sanjay Raut On Goverment : "...मेहरबानी म्हणावी लागेल” संजय राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
ताज्या बातम्या

Sanjay Raut On Goverment : "...मेहरबानी म्हणावी लागेल” संजय राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

फडणवीसांच्या विधानावर राऊतांचा प्रतिउत्तर: राजकीय इच्छाशक्ती समुद्रात बुडाली का?

Published by : Team Lokshahi

मुंबईतील मराठा आरक्षण आंदोलनाचा दुसरा दिवस अधिक तीव्र होत असतानाच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे) खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. राऊत यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुती सरकारवर हल्लाबोल करत मराठा समाजाच्या प्रश्नावर सरकार संवेदनशील नसल्याचा आरोप केला.

“एक दिवसाची मुदत म्हणजे मेहरबानी नाही”

राऊत म्हणाले, “मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला सरकारने एक दिवसाची मुदतवाढ दिली आहे. हे काय मोठे उपकार आहेत का? मेहरबानी म्हणावी लागेल अशी परिस्थिती आहे. हजारो मराठा बांधव शांततेने मुंबईत दाखल झाले आहेत, पावसात बसले आहेत, गैरसोयी सहन करत आहेत. हे सरकारला पाहवत नाही असं दिसतं.”

“राजकीय इच्छाशक्ती समुद्रात बुडाली का?”

फडणवीस यांच्या विधानावर प्रत्युत्तर देताना राऊत म्हणाले, “फडणवीस म्हणतात की आंदोलनाच्या चुलीवर पोळी भाजू नये. पोळ्या भाजण्याचं काम आधी कोणी केलं हे लोक विसरलेले नाहीत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना तुम्हीच म्हणत होता की आठ दिवसांत आरक्षण देता येईल, सरकारकडे राजकीय इच्छाशक्ती नाही. आता तुमच्याकडे सत्ता आहे, मग ही इच्छाशक्ती कुठे हरवली? अरबी समुद्रात बुडाली का?”

“दोन समाजांत तणाव निर्माण करणारे सत्ताधारीच”

राऊत यांनी सरकारवर आरोप केला की तेच दोन समाजांमध्ये तणाव निर्माण करून राजकीय पोळी भाजत आहेत. “आज विरोधकांवर आग लावण्याचा आरोप केला जातो, पण खरं तर हे काम सत्ताधारी करत आहेत. मराठा समाज पावसात भिजतोय, चिखलात बसलाय. मुख्यमंत्री म्हणून तुमच्यात सहानुभूतीचा लवलेशही दिसत नाही.”

“अमित शहा गणपतीला जातात, आंदोलकांना भेटत नाहीत”

गृहमंत्री अमित शहा मुंबईत असतानाही त्यांनी आंदोलकांना भेट दिली नाही, यावरून राऊत यांनी रोखठोक टीका केली. “देशाचे गृहमंत्री मुंबईत आहेत. लालबागचा राजा, आशिषांचा गणपती यांच्या दर्शनाला जातात पण हजारो मराठा बांधव आझाद मैदानात उपोषणाला बसलेले आहेत, त्यांना भेटायला वेळ नाही? हा आरक्षणाचा विषय गृह मंत्रालयाच्या अखत्यारीत येतो. देवेंद्र फडणवीस यांनी शहा यांना जरांगे पाटलांसमोर न्यायला पाहिजे होतं.”

“संविधान बदलता, मग मराठ्यांसाठी का नाही?”

राऊत म्हणाले, “फडणवीस म्हणतात की संविधानाच्या चौकटीत बसणारा मार्ग काढावा लागेल. पण विरोधकांना गुन्हा दाखल केल्यावर अटक करण्यासाठी, खासदार-आमदारांना पद सोडण्यास भाग पाडण्यासाठी तुम्ही संविधान बदलू शकता. मग मराठा समाजासाठी बदल का करत नाही? महाराष्ट्राशी खोटं बोलू नका.”

“सर्व पक्षांना एकत्र आणा”

“आज सरकारमध्ये तीन गट आहेत. शिंदे गट वेगळी भूमिका घेतोय, फडणवीस परशुराम महामंडळाचे काम बघत आहेत, तर अजित पवार चीनच्या भिंतीसारखे तटस्थ आहेत. या परिस्थितीत राजकीय इच्छाशक्ती कुठून येणार? मुख्यमंत्री म्हणून तुमची जबाबदारी आहे की विरोधी पक्षातील सर्व नेत्यांना बोलवा, त्यांच्यासह जरांगे पाटलांची भेट घ्या आणि सामुदायिक निर्णय घ्या.”

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा