थोडक्यात
'गावागावात एक लॉरेन्स बिश्नोई हवा'
संग्रामबापू भंडारे यांचं वादग्रस्त वक्तव्य
'बिश्नोईमुळे देशातील हरीण सुरक्षित'
संग्रामबापूंच्या वक्तव्याने वाद होण्याची शक्यता
संग्रामबापू भंडारे यांच्यावर कॉंग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्यासोबत झालेल्या वादानंतर टीकांचा घेराव पडला. त्यानंतर ते चांगलेच चर्चेत देखील आले. त्यानंतर आज जालन्यात बोलत असताना त्यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. 'बिश्नोईमुळे देशातील हरीण सुरक्षित राहिले त्यामुळे गावागावात एक लॉरेन्स बिश्नोई हवा' संग्रामबापू भंडारे यांच्या या वक्तव्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
संग्रामबापू भंडारे म्हणाले की, "गावागावात एक लॉरेन्स बिश्नोई पाहिजे, माझा लय व्हिडिओ फिरवला की याला लॉरेन्स बिश्नोईचा पुळका का आहे. भारतातील एका नटाकडून हरिण मारले गेली, तेव्हा बिश्नोई समाजाने मागणी केली की माफी मागा. पण तेव्हा दाऊदचा काळ, खान कुठे माफी मागतो. पण विष्णू ही समाजाच्या घरामध्ये एक छोटं पोरगं मोठं होत होतं त्याचा नाव लॉरेन्स बिश्नोई झालं".
"त्याच्यावर काही खिसे मारणे, चाकू दाखवणे, गुन्हे असे नाही, तो परदेशातून फोन लावतो, कोणत्याही देशात गेलं की त्याचे सात आठ दहा कार्यकर्ते आहेत. त्याने खानला मेसेज टाकायची सुरुवात केली की मी तुला ठोकणार आहे. देशभर एक मेसेज निर्माण झाला की हरीण मारलं की लॉरेन्स ठोकतो. त्यामुळे देशातील हरीण सुरक्षित झालं. त्यामुळे गाय वाचवण्यासाठी घडेल त्या परिस्थितीला आपल्याला सामोरे जावे लागेल".
पुढे संग्रामबापू भंडारे म्हणाले की, "जालन्यातील अनवा गावांमध्ये गाईची आणि देवळाची विटंबना झाली, यांच्या टारगेटवर गाई आणि देऊळ आहे. नागपूर मध्ये मज्जतीमध्ये असा काय ब्रेनवॉश केला की बाहेर आल्यानंतर पोलिसांवर कुराडी हाणल्या जी हाद्यानी. पोलिसांनी हिंदूच्या पाठीमागे उभं राहावं. महाराष्ट्रातल्या कोणत्याही गावात जर कोणी औरंग्याचं उदातीकरण करत असेल तर जाग्यावर कार्यक्रम लावा. महाराष्ट्राच्या मातीमध्ये औरंग्याचे उदातीकरण नाही होऊ देणार. देशभरातील मंदिरांना सरकारच्या वतीने कॅमेरे दिले पाहिजे. महाराष्ट्रातील प्रत्येक नेता आपल्याला हिंदुत्ववादी, भगवाधारी बनवायचा".