ताज्या बातम्या

पश्चिम बंगाल पोलिसांची मोठी कारवाई; काँग्रेस आमदारांकडे सापडली कोट्यवधींची रोकड

एवढ्या मोठ्या रोकड जप्त झाल्यानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत.

Published by : Team Lokshahi

झारखंडच्या तीन काँग्रेस आमदारांना पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) मोठ्या रकमेसह पकडण्यात आलं आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आमदारांकडे मिळालेली रक्कम एवढी आहे की, त्यासाठी मशीन मागवण्यात आले आहेत. जप्त केलेले पैसे मोजण्यासाठी ती पोलीस बराच वेळ मशिनची वाट पाहत होते अशी माहिती समोर आली आहे. हावडाच्या एस. पी. स्वाती भंगालिया यांनी सांगितलं की, अटक करण्यात आलेल्या तिघांमध्ये इरफान अन्सारी (जमतारा), राजेश कछाप आणि नमन बिक्सल आमदार (कोलेबीरा) या तिघांचा समावेश आहे.

एवढ्या मोठ्या रोकड जप्त झाल्यानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. झारखंड भाजपचे सरचिटणीस म्हणाले, झारखंडमध्ये काँग्रेसची सत्ता आल्यापासून भ्रष्टाचार सातत्यानं वाढतोय. यापूर्वी झारखंडमधील अधिकाऱ्यांच्या घरातूनही रोख रक्कम जप्त करण्यात आली होती. हे लोक जनतेच्या कष्टाच्या पैशाचा दुरुपयोग करतात असा आरोप त्यांनी केला आहे.

झारखंडच्या काँग्रेस आमदारांना रोख रकमेसह पकडल्यानंतर तृणमुलनेही ट्विट करत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. हा प्रकार धक्कादायक असल्याचं ट्विटमध्ये लिहिलं आहे. हावडा येथे झारखंडमधील काँग्रेस आमदारांच्या कारमधून मोठी रोकड जप्त करण्यात आली आहे. ईडी काही निवडक लोकांविरुद्धच सक्रिय आहे का? असा सवाल देखील करण्यात आला आहे. पश्चिम बंगालचे माजी मंत्री पार्थ चॅटर्जी यांच्या जवळच्या सहकारी अर्पिता मुखर्जी यांच्या घरातून ईडीने सुमारे ५० कोटींची रोकड जप्त केली आहे. शिक्षक भरती घोटाळ्यात ही वसुली झाली असल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : मनसे - शिवसेनेचा आज मुंबईत विजयी मेळावा

आजचा सुविचार

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींच्या कामांना यश मिळण्याची शक्यता , कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?