ताज्या बातम्या

Mumbai Local Train : पश्चिम रेल्वे ठप्प! पॉवर कटमुळे 300 लोकल्सवर परिणाम

सुट्ट्यांचा आनंद डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात घेण्याच्या तयारीत असलेल्या रेल्वे प्रवासाबाबत मुंबईकरांसाठी एक मोठी आणि महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.

Published by : Varsha Bhasmare

सुट्ट्यांचा आनंद डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात घेण्याच्या तयारीत असलेल्या रेल्वे प्रवासाबाबत मुंबईकरांसाठी एक मोठी आणि महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. जर 26 आणि 27 डिसेंबर रोजी तुम्ही घराबाहेर पडणार असाल, तर रेल्वेचे वेळापत्रक तपासूनच बाहेर पडा, अन्यथा तुमचा आनंदाचा बेत बिघडू शकतो. पश्चिम रेल्वेवर कांदिवली ते बोरिवली दरम्यान सहाव्या मार्गिकेचे काम वेगाने सुरू असल्याने शुक्रवारी, 27 डिसेंबर रोजी तब्बल 300 लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.

पश्चिम रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, बोरिवली स्टेशनवर ‘इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग’ पॅनल कार्यान्वित करण्यासाठी 26 डिसेंबर रोजी रात्री अकरा वाजल्यापासून 27 डिसेंबर रोजी सकाळी सात वाजेपर्यंत एक मोठा ‘नॉन-इंटर लॉकिंग’ ब्लॉक घेण्यात येणार आहे. या तांत्रिक कामामुळे केवळ 27 डिसेंबरलाच नव्हे, तर 26 डिसेंबरच्या रात्रीपासूनच रेल्वे सेवेवर परिणाम होणार आहे. या कालावधीत अप आणि डाऊन दोन्ही धीम्या मार्गावरील वाहतूक विस्कळीत होणार असून, प्रवाशांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

फेऱ्या केवळ रद्द होणे इतकेच नाही, तर अनेक लोकलच्या मार्गातही बदल करण्यात आले आहेत. 14 लोकल बोरिवली आणि अंधेरीपर्यंत धावणाऱ्या साधारण फेऱ्या केवळ गोरेगाव स्टेशनपर्यंतच धावतील. तसेच कांदिवली ते दहिसर दरम्यान डाऊन जलद मार्गावर वेगमर्यादा लागू करण्यात आली असल्याने गाड्या नेहमीपेक्षा उशिराने धावतील. मुंबईत येणाऱ्या पर्यटकांना आणि बाहेर जाणाऱ्या प्रवाशांनानवीन वर्षाच्या स्वागतासाठी किंवा नाताळच्या सुट्ट्यांसाठी या ब्लॉकचा मोठा फटका बसणार आहे.

दुसरीकडे, मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठीही परिस्थिती फारशी वेगळी नाही. रेल्वे स्थानक पुनर्विकास आणि कोचिंग कॉम्प्लेक्सच्या कामासाठी पनवेल स्थानकावर 30 डिसेंबरपर्यंत विशेष पॉवर ब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे पनवेल मार्गे कोकणात किंवा पुण्याला जाणाऱ्या अनेक लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला असून, काही गाड्या रद्द किंवा नियमित मार्गावरून वळवण्यात आल्या आहेत.आपली प्रवासाची आखणी करताना हार्बर मार्गावरील प्रवाशांनी देखील रेल्वेच्या अधिकृत घोषणांकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना विनंती केली आहे की, या ब्लॉक कालावधीत विनाकारण होणारी गर्दी टाळण्यासाठी पर्यायी वाहतूक साधनांचा, जसे की बेस्ट बस किंवा मेट्रोचा वापर करावा. रेल्वेचे हे काम प्रवाशांच्या भविष्यातील सोयीसाठी आणि गाड्यांची क्षमता वाढवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असले, तरी सध्याच्या सुट्ट्यांच्या काळात यामुळे मुंबईकरांच्या संयमाची परीक्षा पाहणारे ठरणार आहे.सुट्ट्यांचा आनंद डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात घेण्याच्या तयारीत असलेल्या रेल्वे प्रवासाबाबत मुंबईकरांसाठी एक मोठी आणि महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. जर 26 आणि 27 डिसेंबर रोजी तुम्ही घराबाहेर पडणार असाल, तर रेल्वेचे वेळापत्रक तपासूनच बाहेर पडा, अन्यथा तुमचा आनंदाचा बेत बिघडू शकतो. पश्चिम रेल्वेवर कांदिवली ते बोरिवली दरम्यान सहाव्या मार्गिकेचे काम वेगाने सुरू असल्याने शुक्रवारी, 27 डिसेंबर रोजी तब्बल 300 लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा