ताज्या बातम्या

26/11 Terrorist Attack: 26 नोव्हेंबर 2008ला नेमकं काय घडलं होतं?

लष्कर-ए-तैयबाच्या प्रशिक्षित सशस्त्र दहा अतिरेक्यांनी मुंबईतील अनेक ठिकाणी आणि प्रतिष्ठित इमारतींवर हल्ला केला होता. सलग चार दिवस झालेल्या या हल्ल्यात 160 हून अधिक लोक मारले गेले.

Published by : Team Lokshahi

लष्कर-ए-तैयबाच्या प्रशिक्षित सशस्त्र दहा अतिरेक्यांनी मुंबईतील अनेक ठिकाणी आणि प्रतिष्ठित इमारतींवर हल्ला केला होता. सलग चार दिवस झालेल्या या हल्ल्यात 160 हून अधिक लोक मारले गेले. 26 नोव्हेंबर 2008 च्या त्या रात्री सुरू झालेल्या गोळीबाराने मुंबई हादरली. हल्लेखोरांनी मुंबईतील दोन फाईव्ह स्टार हॉटेल्स, एक हॉस्पिटल, रेल्वे स्टेशन आणि ज्यू सेंटरला टार्गेट केलं होतं. हा हल्ला इतका मोठा असेल याचा कोणालाही अंदाज आला नव्हता. पण हळूहळू परिस्थिती चिघळत गेली आणि त्याच्या गांभीर्याचा अंदाज येऊ लागला.

26 नोव्हेंबरच्या त्या रात्री दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे यांच्यासह मुंबई पोलिसांच्या अनेक अधिकाऱ्यांना आपले प्राण गमवावे लागले. लिओपोल्ड कॅफे आणि छत्रपती शिवाजी टर्मिनसपासून सुरू झालेलं हे मृत्यूचं तांडव ताजमहाल हॉटेलजवळ जाऊन संपलं. या दरम्यान 160 हून जास्त लोकांना त्यांचे प्राण गमवावे लागले. तर सुरक्षा दलाच्या जवानांना या ऑपरेशनसाठी 60 तासांहून अधिक वेळ लागला. पण त्या रात्री नेमकं काय काय घडलं ते जाणून घेऊ...

लिओपोल्ड कॅफे (Leopold Cafe Mumbai Attack)

सीएसटीच्या जवळ असलेल्या लिओपोल्ड कॅफेमध्ये दोन दहशतवादी घुसले. लिओपोल्ड कॅफे हे विदेशी नागरिकांच्या आवडीचे ठिकाण आहे. युरोपियन आणि इस्त्रायली नागरिक या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर येतात. या कॅफेमध्ये जाऊन दहशदवाद्यांनी अंधाधुंद गोळीबार सुरू केला. या ठिकाणी 10 जणांचा मृत्यू झाला.

छत्रपती शिवाजी टर्मिनस (CST Mumbai Attack)

नेहमीच गर्दीने गजबजलेले सीएसटी स्थानक त्या दिवशीही भरलेलं होतं. अनेकजण आपापल्या प्रवासाच्या प्रतीक्षेत होते. त्यावेळी अजमल कसाब आणि इस्माईल खान हे दोन दहशतवादी सीएसटीमध्ये शिरले आणि त्यांनी गोळीबार सुरू केला. या ठिकाणी 58 जणांचा मृत्यू झाला.

ओबेरॉय हॉटेल (Mumbai Oberoi Hotel Attack)

ओबेरॉय हॉटेल हे अनेकांच्या आवडीचे हॉटेल. या ठिकाणी दोन दहशतवादी घुसले. त्यांच्याकडे मोठा शस्त्रसाठा होता. त्यावेळी हॉटेलमध्ये जवळपास 350 पेक्षा जास्त लोक उपस्थित होते.

कामा हॉस्पिटल (Cama Hospital Terrorist Attack)

सीएसटीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या कामा हॉस्पिटलमध्ये दहशतवादी घुसले. कामा हॉस्पिटलच्या बाहेरच्या झाडामागे लपलेल्या दहशतवाद्यांनी एक पोलीस गाडी येताना पाहिली आणि त्यांनी त्यावर गोळीबार सुरू केला. या गोळीबारात हशतवादविरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे, मुंबई पोलिसांतील धाडसी अधिकारी अशोक कामटे आणि एन्काऊंटर स्पेशलिस्ट विजय साळसकर हे शहीद झाले. त्यानंतर दहशतवाद्यांनी ती कार ताब्यात घेतली.

नरिमन हाऊस (Nariman House Attack)

नरिमन हाऊस म्हणजे खबाड (छबाड) हाऊस हे इस्त्रायली नागरिकांचे ठिकाण समजले जाते. या ठिकाणी ज्यू लोकांच्या मदतीसाठी एक केंद्र बांधले होते. तसेच याकेंद्रात ज्यू धर्मग्रंथांची एक मोठी लायब्ररी आणि एक सिनेगॉग आहे. त्यामुळे दहशतवाद्यांनी या ठिकाणाला लक्ष्य केलं.

ताजमहाल हॉटेल (Hotel Taj Mahal Palace Terrorist Attack)

समुद्राच्या किनारी असलेले ताजमहल हॉटेल हे शंभर वर्षाहून जुने हॉटेल. या ठिकाणी देशातल्या महत्त्वाच्या व्यक्तींसोबत परदेशी नागरिकांची कायमच गर्दी असते. त्यामुळे या हॉटेलमध्ये दहशतवादी घुसले आणि गोळीबार सुरू केला. दहशतवाद्यांच्या गोळीबाराने आणि बाँबहल्ल्याने या हॉटेलमधून आगीचे लोट येत होते. ऐतिहासिक अशी ही इमारत जी मुंबईची शान समजली जाते, ती जळत होती आणि जग ते पाहत होते. या हॉटेलमध्ये दहशतवाद्यांच्या गोळीबारात 31 लोकांचा जीव गेला.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Ganesh Festival 2025 : गणेशोत्सवापूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना पगाराचा गोड प्रसाद

Manikrav Kokate : रिओ वर्ल्ड चॅम्पियनशिपपूर्वी जिनॅस्ट संयुक्ताला क्रीडामंत्र्यांचा फोन; 'महाराष्ट्राची हिरकणी' म्हणून संबोधत गौरविले

Palghar Gas Leak : बोईसर तारापूर MIDC मध्ये पुन्हा वायुगळती; 4 कामगारांचा मृत्यू तर 1 जखमी

Ganesh Festival Pune 2025 : बाप्पा पावला! गणेशोत्सवात 24 तास धावणार मेट्रो, एकदा पाहा वेळापत्रक